आरोग्य
अत्यावश्यक सेवा सोडून टाळेबंदीचे स्वागत-नगराध्यक्ष वहाडणे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ७३६ इतकी मोठी झाली आहे.त्यात १८९ रुग्ण सक्रिय आहेत,तर काल एकाची वाढ होऊन आतापर्यंत १४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे तर अनेक महत्वाच्या नागरिकांना या साथीची धक्कादायक पद्धतीने बाधा झाली आहे.त्यामुळे तालुका प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला असून त्याला नागरिकांनी आपल्या हितासाठी सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.
आपल्या कुटुंबाकडे सर्वेक्षण करिता येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करून अचूक माहिती देवून सहकार्य करावे.याकामी दि.२८ ते ३१ ऑगस्ट २०२० या ४ दिवस सर्व अत्यावश्यक सेवासह सर्व आस्थापना १०० टक्के टाळेबंदी राहणार आहे.यादरम्यान फक्त दवाखाने व मेडिकल सुरू राहतील,दुध सकाळी ५ ते ८ या वेळेत,बँक व पतसंस्था आदी मध्ये अत्यावश्यक काम असेल तरच बँकेत जावे-मुख्याधिकारी प्रशांत सरोदे
कोपरगाव शहर व तालुका प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार योगेश चंद्रे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,गटविकास अधिकारी सतीश सूर्यवंशी,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी वाढत्या रुग्णांच्या साथीला आळा घालण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे,पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व अन्य प्रतिष्ठित नागरिक यांनी केलेल्या मागणीला साथ देत नुकतीच तहसीलदार कार्यालयात बैठक घेऊन नागरिकांच्या हितासाठी शहरात टाळे बंदी करण्याचा स्तुत्य निर्णय घेऊन शहर तालुक्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे.कोपरगाव शहरात कोविड-१९ कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने ज्या भागात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे,त्या गांधीनगर, महादेवनगर,गोरोबानगर,दत्तनगर, टिळकनगर, विवेकानंद नगर, सप्तर्षीमळा,कालेमळा, सुभाषनगर, संजयनगर, समतानगर ,निवारा व सुभद्रानगर इ. भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची कोरोना सदृष लक्षणांची सर्वेक्षण करणेसाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
आपल्या कुटुंबाकडे सर्वेक्षण करिता येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करून अचूक माहिती देवून सहकार्य करावे.याकामी दि. २८ ते ३१ ऑगस्ट २०२० या ४ दिवस सर्व अत्यावश्यक सेवासह सर्व आस्थापना १०० टक्के टाळेबंदी राहणार आहे.यादरम्यान फक्त दवाखाने व मेडिकल सुरू राहतील,दुध सकाळी ५ ते ८ या वेळेत,बँक व पतसंस्था आदी मध्ये अत्यावश्यक काम असेल तरच बँकेत जावे खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे इ. लक्षणे दिसल्यास उपचार घ्या.एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास,त्यांना तपासणी करण्यास प्रोत्साहित करा.कुटुंबातील लहान मुले व जेष्ठांची काळजी घ्या.कोविड-१९ ची लक्षणे दिसत असलेल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र यांची माहिती त्वरित प्रशासनाला कळवा,काळजी करू नका सावध रहा.स्वतः ला इतरांना सुरक्षित ठेवा,मुखपट्टी व सॅनिटायझर चा नियमित वापर करा.घरी राहा, सुरक्षित राहाप्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहनही नगराध्यक्ष विजय वहाडणे,तहसीलदार योगेश चंद्रे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर आदींनी केले आहे.