जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रुग्णवाढीचा दर मंदावला,कोपरगाव बंद बाबत मात्र संभ्रम

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत दहा रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून आज केलेल्या ५९ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये १८ रुग्ण बाधित झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून ४१ संशयितांचे अहवाल निरंक आले आहे,तर नगर येथे ८ स्राव तपासणी साठी पाठवले होते ते सर्व निरंक आले आहेत.उपचारानंतर ०५ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान कोपरंगाव शहरातील रुग्णवाढ रोखण्यासाठी शहर बंद ठेवण्याबाबत मात्र शहरात उभे दोन तट पडल्याचे दिसत आहे.त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

आमच्या प्रतिनिधीने या बाबत समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या आवाजातील क्लिपच्या खरे पणाबद्दल दुजोरा दिला आहे.व आगामी काळात रुग्ण वाढ थोपवायची असेल तर कोपरगाव शहर बंद करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले आहे.मात्र या घटनेकडे काही लोक राजकारण म्हणून पाहत असल्याने अडचणी येत असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज अखेर एकूण बाधित रुग्णांची संख्या ५५० इतकी झाली आहे.त्यात १७२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत १० जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८१ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार ६८५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १० हजार ७४० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २०.४८ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३६८ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६६.९ टक्के झाला आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात एक आवाजातील संदेश (क्लिप) सामाजिक संकेत स्थळावर फिरत असून यात समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व अजमेरे यांचा संवाद असून यात कोपरगाव शहरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असताना काही व्यापारी त्यांच्या घरात कोरोना बाधित रुग्ण असतानाही आपली दुकाने उघडी ठेऊन आपला व्यवसाय जोमात करत असल्याचे चित्र रंगवले आहे.त्यामुळे असे व्यापारी कोण ? याची शहरातील चौकाचौकात चर्चा सुरु झाली आहे. त्याच संवादात कोविड सेंटरमध्ये बाधित रुग्णांवर उपचार करण्याची वेगवेगळी बिले आकारण्यात येत असून ती ३६ हजारापासून ०३ लाख रुपयापर्यंत वेगवेगळी असल्याचे ऐकविण्यात येत असून यात सामान्य माणसांना हा उपचार कसा परवडू शकतो ? असा सवाल उपस्थित करून नागरिकांना या साथीत मरण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे म्हटले आहे.एकीकडे शासन म्हणते आम्ही उपचारासाठी तीन लाख रुपये कोविड सेंटर साठी मंजूर केलेले आहे.बाधित रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारू नये मात्र कोपरगाव तालुक्यातील कोविड सेंटर मध्ये मात्र नेमका उलटा अनुभव येत आहे.त्यामुळे तालुक्याचे आमदार व तालुका वैद्यकीय अधिकारी,तालुका दंडाधिकारी यांनी यावर खुलासा करणे गरजेचे आहे.अन्यथा नागरिकांची लूट सुरूच राहील.व सामान्य माणसांना हा उपचार करणे परवडणारे राहणार नाही.आमच्या प्रातिनिधीने या बाबत समता पतसंस्थेचे अध्यक्ष कोयटे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या आवाजातील क्लिपच्या खरे पणाबद्दल दुजोरा दिला आहे.व आगामी काळात रुग्ण वाढ थोपवायची असेल तर कोपरगाव शहर बंद करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले आहे.मात्र या घटनेकडे काही लोक राजकारण म्हणून पाहत असल्याने अडचणी येत असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव शहर बंद बाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी,”आपला शहर बंद ठेवण्यासाठी विरोध नाही.मात्र प्रशासन मात्र त्याला अनुकूल नाही.या पूर्वीही आपण रुग्ण वाढ थांबविण्यासाठी ११ ऑगष्ट रोजी एक जाहीर बैठक बोलावून त्यात आवाहन केले होते मात्र त्यास काही नागरिकांनी विरोध केल्याने शहर बंद ठेवणे शक्य झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.व कोणा एकाही नागरिकांचा विरोध नसेल तर आपला स्वयंघोषित नागरिकांच्या बंदला पाठींबा राहील”असे स्पष्ट केले आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपल्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात व आत्मा मालिक येथील सुरु असलेल्या कोविड सेंटर मध्ये शासन कोरोना बाधित रुग्णांवर मंजूर खाटांप्रमाणे उपचार करताना कोणतेही शुल्क आकारत नाही तेथे उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून उपचार साहित्य मिळत आहे.तर आ.आशुतोष काळे यांचेकडून पी.पी.ई.किट,थर्मल स्कॅनर,पल्स ऑक्सिमिटर,मुखपट्या,हातमोजे,प्रतिबंधात्मक रासायनिक औषधे व मृत व्यक्तीवर अंत्यसंकार करण्याचे साहित्य त्यांनी पुरवले आहे.तर बाकी सॅनिटायझर,सोडियम क्लोराईड,आदी साहित्य व शहर स्वच्छता,फवारण्या आदींसाठी मनुष्यबळ कोपरगाव नगरपालिका देत असल्याचे सांगितले आहे.मात्र तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मात्र नेहमीप्रमाणे दूरध्वनीवरून प्रतिसाद दिला नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close