आरोग्य
कोपरगावला पुन्हा मिळाला दिलासा,रुग्णसंख्या घटली
जनशक्ती न्यूज सेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने उच्चान्क गाठला असला तरी गत तीन दिवसापासून रुग्ण वाढीला आळा बसला असल्याचे चित्र असताना काल पुन्हा एकदा कोरोना बाधितांचा आकडा वाढला होता मात्र आज आलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये ५ रुग्ण बाधित आढळले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
आज कोपरगाव तालुक्यात बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये साईप्रभानगर येथे दोन रुग्ण आहे त्यात ३६ वर्षीय तरुण तर ३२ वर्षीय इसम आढळले आहे तर श्रद्धानगरी येथे ४५ वर्षीय पुरुष,जोशींनगर येथे २२ वर्षीय महिला धारणगाव रोड येथे ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या ३७६ झाली असून सक्रिय रुग्ण १०१ आहे तर आता पर्यंत मृत्यू पावणारीस संख्या ५ झाली आहे.तर आज पर्यंत २ हजार १७२ रुग्णांच्या श्रावांची तपासणी झाली आहे.त्यात १७.३१ टक्के रुग्ण बाधित आढळले आहे.तर उपचाराला साथ देणाऱ्या रुग्णांची संख्या २७० झाली आहे त्याची टक्केवारी ७१.८० टक्के तर मृत्यू दर १.३२ टक्के असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.