आरोग्य
सुरेगावाचे..ते संशयित अहवाल आले स्फोटक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगावाचे ग्रामपंचायत हद्दीतील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १७ संशयितांचे अहवाल आज तीन दिवसांनी आले असून त्यातील ८ जण बाधित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिशीस दिली आहे.त्यामुळे तालुक्यात एका वेळी एवढ्या संख्येने रुग्ण वाढण्याची हि पहिलीच वेळ असल्याने सुरेगावसह तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुरेगावात कोरोना बाधित असल्याची धक्कादायक बातमी अकरा जुलै रोजी हाती आली होती.दरम्यान या कुटूंबात चार भाऊ त्यांच्या पत्नी,आई,वडिल असा मोठा परिवार आता संशयितांच्या यादीत असल्याचा अंदाज खरा ठरला असून या कुटुंबासह या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १७ जणांना अरोग्य विभागाने आपल्या ताब्यात घेऊन त्यानां तातडीने कोपरगाव शहरातील विलगीकरण कक्षात रवानगी करुन त्यांचे अहवाल तपासणीसाठी नगर येथे रवानगी केली होती.ते अहवाल आज उशिरा आले आहेत.
कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र दि.११ जुलै पर्यंत आरोग्य विभागाने १६५ जणांना ताब्यात घेतले त्यांची तपासणी करून त्यातील १५२ जणांना सोडून देण्यात आले होते तर २२९ जणांचे अहवाल तपासणी करण्यात आली होती. त्यातील १३ जण कोरोना बाधित आढळले होते.तर १२ जण रोगमुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले असताना अकरा जुलै अखेर असलेले प्रलंबित १३ अहवाल प्राप्त होऊन ते निरंक आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली असताना त्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच त्याच दिवशी सायंकाळी सुरेगावात कोरोना बाधित असल्याची धक्कादायक बातमी हाती आली होती.दरम्यान या कुटूंबात चार भाऊ त्यांच्या पत्नी,आई,वडिल असा मोठा परिवार आता संशयितांच्या यादीत असल्याचा अंदाज खरा ठरला असून या कुटुंबासह या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १७ जणांना अरोग्य विभागाने आपल्या ताब्यात घेऊन त्यानां तातडीने कोपरगाव शहरातील विलगीकरण कक्षात रवानगी करुन त्यांचे अहवाल तपासणीसाठी नगर येथे रवानगी केली होती.ते अहवाल आज उशिरा आले आहेत.त्यामुळे सुरेगावसह तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.आता तालुका प्रशासनास अधिकची सावधानता बाळगावी लागणार आहे.व नागरिकांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहे.नागरिकांनी न ऐकल्यास दंडाची रक्कम किंवा टाळेबंदीचा पुन्हा विचार करावा लागणार आहे.