आरोग्य
कोरोना प्रतिबंधक औषधांची चाचणी परीक्षेत दमछाक !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना साथीचा संसर्ग शीघ्र गतीने वाढून शहरी भागाकडून ग्रामीण भागापर्यंत पोहचला आहे.अनेक उत्पादनांचे या आजारास बरे करण्याचे दावे-प्रतिदावे झाले आहे.परंतु ते काळाच्या कसोटीवर टिकले नाही.मात्र कोपरगाव येथील संशोधक डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी सरकारला शासकीय स्तरावर प्रोटेक व कफेक्स या उत्पादनाच्या चाचण्या कोरोना वर घ्याव्या अशी वेळोवेळी विनंती करूनही त्याला शासकीय पातळीवर अद्याप नेहमीच्या पद्धती प्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही.त्या बाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रोटेक व कफेक्स हे कोपरगाव ते देशाच्या कान्या-कोपऱ्यात रुग्णांना लाभदायी ठरत आहे व ही उत्पादने लोक चळवळीतून कोरोना साठी पुढे आली आहेत. या उत्पादनांची एफ.डी.ए. नोंदणी ताप,सर्दी खोकला या साठी इम्युनो बूस्टर म्हणून झाली आहे.दररोज १० हजार रुग्ण लाभ घेतील इतकी उत्पादन क्षमता व त्यासाठी लागणारा कच्चा माल या कंपनी कडे आहे-डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ०१ हजार ४०६ ने वाढून ती ५ लाख ३० हजार ६९२ इतकी झाली असून १६ हजार १२४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०१ लाख ५९ हजार १३३ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ०७ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३३८ वर जाऊन पोहचली आहे तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.यावर अद्याप परिणामकारक औषध सापडलेले नाही.ज्या कंपन्या या प्रयत्नांत आहे त्यांनी निर्माण केलेल्या औषधांच्या चाचण्या करण्यास शासकीय यंत्रणेला वेळ दिसत नाही याचा दाहक अनुभव कोपरगाव येथील डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांच्या अश्वमेध कंपनीला येत आहे.
डॉ.वाघचौरे यांच्या कंपनीने निर्माण केलेल्या प्रोटेक व कफेक्स या औषधाने अनेक रुग्ण बरे केल्याचा दावा केला आहे.मात्र त्याकडे लक्ष देण्यास शासकीय यंत्रणेला वेळ नाही.हे मोठेच दुर्दैव मानावे लागेल.दरम्यानच्या काळात कोपरगाव,राहता व नाशिकचे काही भाग या उत्पादना मुळे कोरोना मुक्त झाले.प्रोटेक व कफेक्सच्या प्रस्तावास मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद व आई.सी.एम.आर.कडे चाचण्या घेण्यासाठी शिफारस केली असे डॉ.लहाने यांनी सांगितले आहे. मात्र पुढे काहीही हालचाल झालेली नाही.परंतु प्रसार माध्यमे व सामाजिक संकेतस्थळावर माहिती घेऊन अनेक रुग्णांनी हे औषध कोविड-१९ ची चाचणी सकारात्मक आल्यावर घेतले व ते या औषधाने बरे होत आहेत व कोविड साठी लोकांनी हे उत्पादन वापरावे अशा शिफारसी लाभार्थी स्वतः करत आहेत.त्यामुळे अश्वमेधचे प्रोटेक व कफेकस हे उत्पादने लोकमान्य झाले असल्याचे दिसत असले तरी पिकते तेथे विकत नाही या नेहमीच्या भारतीय शिरस्त्याचा अनुभव या कंपनीला येत आहे.प्रोटेक व कफेक्स हे कोपरगाव ते देशाच्या कान्या-कोपऱ्यात रुग्णांना लाभदायी ठरत आहे व ही उत्पादने लोक चळवळीतून कोरोना साठी पुढे आली आहेत.या उत्पादनांची एफ.डी.ए.नोंदणी ताप,सर्दी खोकला या साठी इम्युनो बूस्टर म्हणून झाली आहे.दररोज १० हजार रुग्ण लाभ घेतील इतकी उत्पादन क्षमता व त्यासाठी लागणारा कच्चा माल या कंपनीकडे आहे.डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे यांची जगाच्या पाच खंडांमध्ये या उत्पादन विषयी चाचपणी झाली आहे.व त्याची मागणी होत आहे.भारतीय उद्योग व उत्पादनांना भारतात ही अडचण का येत आहे ? असा सवाल सामान्य जनता विचारत आहे, यातून मार्ग संशोधन हेच आहे फक्त गरज आहे ती शासन स्तरावर चाचण्या घेण्याची मात्र या पातळीवर सध्या तरी शुकशुकाट दिसत आहे.”सरकारी काम आणि सहा महिने थांब” या म्हणीचा कटू प्रत्यय या कंपनीस येत असल्याने सरकार अद्यापही या साथीबाबत किती गंभीर आहे.याचा हा उत्तम नमुना ठरत आहे.