जाहिरात-9423439946
कृषी व दुग्ध व्यवसाय

…या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुका कृषी विभागाच्या वतीने रांजणखोल येथे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांवर मोठ्या उत्साहात मार्गदर्शन करण्यात आले आहे.

दरम्यान या ठिकाणी कृषी सहायक किरण धुमाळ यांनी रब्बी कांदा पीक लागवड तंत्रज्ञानातील  रोपवाटिका,बीजप्रक्रिया,खत व तण व्यवस्थापन, कांदा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.राहाता तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी स्मार्ट प्रकल्प,पीक विमा योजना,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याविषयी मार्गदर्शन केले आहे.

महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणखोल येथे राज्यपुरस्कृत मूल्यसाखळी सोयाबीन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना शेतीशाळा कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.लोणी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत वाकचौरे यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.कृषी यांत्रिकीकरण,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व इतर योजना विषयी मार्गदर्शन केले.

कृषी सहायक किरण धुमाळ यांनी रब्बी कांदा पीक लागवड तंत्रज्ञानातील  रोपवाटिका,बीजप्रक्रिया,खत व तण व्यवस्थापन, कांदा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.राहाता तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी स्मार्ट प्रकल्प,पीक विमा योजना,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.तसेच शेतकऱ्यांना सोयाबीन पीक निविष्ठा व ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी अंबादास ढोकचौळे,आबासाहेब ढोकचौळे,बाळासाहेब ढोकचौळे,विलास ढोकचौळे,आप्पासाहेब डांगे आदी ग्रामस्थ व कृषी विभागाचे वैशाली आडसुरे,विनय भाकरे हे उपस्थित होते.कृषी सहायक श्रीमती शीला लाटे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले आणि आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close