जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

आमदाराच्या स्वीय सहाय्यकावर घेणा हल्ला,पाच जण अटकेत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात काल रात्री ०९ वाजेच्या सुमारास आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील कार्यकर्ता आशिष मिननाथ आंग्रे (वय-२७) यांच्यावर गांधीनगर येथील शनी चौक येथे तोंड बांधून ०६ ते ०७ लोकांनी गज व विटांनी हल्ला केला.सदर हल्ल्यात आशिष आंग्रे गंभीर जखमी झाला आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली असता त्यात आरोपी नयन गोविंद शिंदे (वय-२१) रा.दत्तनगर,विकी किशोर शिंदे,(वय-१९) रा.गजानन नगर कोपरगाव.आकाश सखाराम माकोणे (वय-२३) रा.दत्तनगर,भारत भाऊसाहेब आव्हाड,(वय-१९)रा.निंभर कोपरगाव अतुल देविदास आव्हाड (वय-१९) रा.गजानन नगर कोपरगाव यांना अटक केली आहे तर या गुन्ह्यात अजून एक दोन जण अटक होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.यात नयन शिंदे यास पोलिसांनी अटक केल्यावर त्याने पोलिसांना आरोपींची दिशा दिली असल्याची माहिती आहे त्यामुळे पुढील कार्यवाही सोपी गेली आहे.

कोपरगाव शहर आगामी लोकसभा व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशांत झाल्याचे दिसत असून गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ झाल्याचे दिसत असून यात वरचेवर वारंवार घटनांत वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील पोलीस प्रशासनावर कामाचा ताण वाढताना दिसत आहे.अशीच घटना काल गिरवर दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास हा वरील जीवघेणा हल्ला झाला आहे.सत्ताधारी गटाच्या कर्मचाऱ्यांवर हा हल्ला झाल्याने ही यावर शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

जखमी अक्षय उर्फ आशिष आंग्रे छायाचित्रातत दिसत आहे.

कोपरगावातील राजकीय नेते आपल्या श्रेयवादात कायम तरुणांचा बळी जाताना दिसत आहे.त्यातून खडकी रोड तारांगण किराणा दुकानाजवळ गत वर्षी१५ ऑगष्ट रोजी रस्त्याचे उदघाटन करताना नेत्यांनी एकमेकांविरुद्ध दंडाच्या बेटकुळ्या दाखवून तमाशा साजरा केला होता तर परस्परांचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले होते.त्यातून हा पुढील अंक घडला असल्याचे मानले जात आहे.


   दरम्यान आगामी काळात हा तमाशा वाढणार असल्याचे बोलले जात आहे.या घटनेने कोपरगाव शहरात मोठी खळबळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादी आशिष आंग्रे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल क्रं.७९/२०२४ भा. द.वि.कलम३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,४२७ प्रमाणे पाच आरोपी विरुद्ध गुंन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्फदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहे.

मारहाणीच्या घटनेनंतर जमा झालेली गर्दी दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close