आरोग्य
सावतामाळी युवक संघाकडुन मुखपट्यांचे वाटप संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
थोर स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी श्री संत सावता माळी युवक संघ,राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी स्वतः थेट बांधावर जाऊन शेतकरी व अन्य ठीकाणी मुखपट्ट्या व सॅनिटाईझरचे मोफत वाटप सुरक्षित अंतर राखत केले आहे.यावेळी सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱ्या गवळी कुटुंबाची दखल घेत त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी थेट बांधावर जाऊन शेतकरी व अन्य ठीकाणी मुखपट्ट्या व सॅनीटायझर चे मोफत वाटप केले.व हे करत असतांना त्यांनी सदैव सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱ्या सामाजिक कार्यंकर्ते आजीनाथ गवळी व त्यांची कन्या स्वच्छतादुत कु.योगीता गवळीसह त्यांच्या कुटुंबाची दखल घेत त्यांचे कौतुक केले आहे.तसेच गुलदगड यांनी मातोरी सेवातिर्थचे सचिन गायकवाड व तपासणी नाक्यावरील कर्मचारी तसेच अनेक ठिकाणी मुखपट्या व सॅनिटायझरचे वाटप केले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.