आरोग्य
अश्वमेधचे कोरोना निर्मूलनासाठी आयुर्वेदिक औषध !

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना अद्याप या साथीवर उपचार सापडलेला नसताना कोपरगाव शहरातील प्रसिद्ध किडरोग तज्ज्ञ व आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी मात्र आपल्या कोपरगावस्थित अश्वमेध कंपनीकडे या विषाणूंचा बंदोबस्त करणासाठी कॅफेक्स हे जालीम आयुर्वेदीक औषध उपलब्ध असल्याचा दावा केला असून या औषधीने अनेक रुग्णांना गुण आल्याचे म्हटले आहे.तथापि शासकीय कसोटीवर त्याची तपासणी मात्र प्रलंबित आहे त्यामुळे त्यास शासन मान्यता मिळण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
आयुर्वेदाची सुरवात ब्रह्मदेवापासून झाली असे मानले जाते.आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते.आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे.आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी,आहाराविषयक नियम,व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.आयुर्वेदातील सिद्धान्त आणि औषधे आधुनिक विज्ञानाच्या वैद्यकीय चाचणी या पद्धतीनुसार तपासलेली नसतात.त्यामुळे आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी या (clinical trials) चाचण्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे.
सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढविण्याची तयारी केली आहे.मात्र अद्याप जागतिक पातळीवर त्या साथीवर उपचार शोधण्यात यश मिळालेले नसताना व जागतिक पातळीवर निव्वळ दावे-प्रतिदावे चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील प्रसिद्ध किडरोग तज्ज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी मात्र आपण आपल्या कंपनीत संशोधित केलेले कॅफेक्स हे आयुर्वेदिक औषध मात्र त्यावर लागू होत असल्याचा दावा केला आहे.
जगात कोरोना साथीमुळे ३ लाख ४९ हजार १३० नागरिकांचे प्राण घेतले असून भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ८६ ४ ने वाढून ती १ लाख ७४ हजार ३५५ इतकी झाली असून ४ हजार ९८२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६२ हजार २२८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २ हजार ०९८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १०२ वर जाऊन पोहचली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे,दिल्ली हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढविण्याची तयारी केली आहे.मात्र अद्याप जागतिक पातळीवर त्या साथीवर उपचार शोधण्यात यश मिळालेले नसताना व जागतिक पातळीवर निव्वळ दावे-प्रतिदावे चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील प्रसिद्ध किडरोग तज्ज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी मात्र आपण आपल्या कंपनीत संशोधित केलेले कॅफेक्स हे आयुर्वेदिक औषध मात्र त्यावर लागू होत असल्याचा दावा केला आहे.व मुंबई पोलीस दलातील बाँम्ब संशोधक पथकातील काही पोलीस शिपायांना मोफत दिले असून त्याचा चांगला अनुभव आला असल्याचा दावा केला आहे.नाशिक मधील अनेक रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे.
डॉ.वाघचौरे यांच्या कंपनीने मुंबई विद्यापीठातील जीव भौतिक शास्त्र विभागाशी सामंजस्य करार केला असून त्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ.प्रभाकर डोंगरे यांनी त्यांच्या उत्पादनाची शिफारस मुंबई कॉर्पोरेशन व राज्य कोविड टास्क फोर्स तसेच के.ई.एम.रुग्णालय यांच्या बरोबर संपर्क ठेऊन आहेत.सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ.वाघचौरे यांची कंपनी त्यांना शास्त्रीय मदत करणार आहे.
या बाबतीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डॉ.वाघचौरे यांनी सरकारी यंत्रणांना वारंवार ई-मेल द्वारा या औषधाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.प्रशासनातील काही निवडक वैद्यकीय अधिकारी त्याचा वापर करत आहे.त्याचा सकारात्मक परिणाम येत आहे.या बाबत डॉ.वाघचौरे यांच्या कंपनीने मुंबई विद्यापीठातील जीव भौतिक शास्त्र विभागाशी सामंजस्य करार केला असून त्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ.प्रभाकर डोंगरे यांनी त्यांच्या उत्पादनाची शिफारस मुंबई कॉर्पोरेशन व राज्य कोविड टास्क फोर्स तसेच के.ई.एम.रुग्णालय यांच्या बरोबर संपर्क ठेऊन आहेत.सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ.वाघचौरे यांची कंपनी त्यांना शास्त्रीय मदत करणार आहे.सरकारी पातळीवर या औषधांची चाचणी करण्यासाठी अद्यापही ते प्रयत्नांत आहे.सध्या हि कंपनी कॅफेक्स व प्रोटेक या औषधांचे उत्पादन करणार असून या औषधांचे ५० हजार रुग्णांना पूरेल इतका औषधसाठा आहे.मात्र अधिकचा साठा करण्यासाठी मात्र कंपनीला या वनस्पतींची लागवड करण्यासाठी मात्र केवळ पंधरा जून पर्यंतच मुदत असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले आहे.अन्यथा या साठी वर्षभर वाट पाहावी लागण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे.दरम्यान या औषधासाठी शिर्डीचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आयुष्य मंत्रालयाकडे शिफारस केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे राज्यासह नगर जिल्ह्यातील नागरिकांचे या आयुर्वेदीक औषधाकडे व शासन निर्णयाकडे लक्ष लागून आहे.