आरोग्य
…आता गंभीर आजारातील वेदनांना होणार उतार!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील प्रसिद्ध सर्जन डॉ.राजेश माळी यांच्या साई पॉलीक्लिनिकमध्ये डॉ.माळी यांचे सुपुत्र डॉ.साहिल माळी यांनी अमेरिकेत शिक्षण घेऊन कोपरगावकरांसाठी अतिदक्षता नंतरची अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध करून दिली असून त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“पॅलिएटिव्ह केअर ही केवळ शेवटच्या टप्प्यातील उपचार नाही,तर आजाराच्या सुरुवातीपासूनच ती देऊ शकतो.पॅलिएटिव्ह केअरचा मुख्य उद्देश म्हणजे “रुग्णाला जास्तीत जास्त आरामदायी जीवन देणे”यात वेदना नियंत्रण,श्वास घेण्यास त्रास,उलट्या,थकवा,भूक न लागणे यांसारख्या लक्षणांचे व्यवस्थापन केले जाते.कर्करोग,हृदयरोग,किडनी फेल्युअर, न्यूरोलॉजिकल आजार (जसे की पार्किन्सन,अल्झायमर),तसेच एचआयव्ही(एड्स) अशा अनेक गंभीर आजारांमध्ये पॅलिएटिव्ह केअरची गरज असते”-डॉ.साहिल माळी, कोपरगाव.
पॅलिएटिव्ह केअर म्हणजे गंभीर,दीर्घकालीन किंवा जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी दिली जाणारी समग्र काळजी होय. या प्रकारच्या सेवेमध्ये रुग्णाच्या वेदना कमी करणे,मानसिक ताणतणाव कमी करणे,तसेच त्यांच्या कुटुंबीयांना भावनिक व सामाजिक आधार देणे यावर भर दिला जातो.पॅलिएटिव्ह केअर ही केवळ शेवटच्या टप्प्यातील उपचार नाही,तर आजाराच्या सुरुवातीपासूनच ती देऊ शकतो.पॅलिएटिव्ह केअरचा मुख्य उद्देश म्हणजे “रुग्णाला जास्तीत जास्त आरामदायी जीवन देणे”.यात वेदना नियंत्रण,श्वास घेण्यास त्रास,उलट्या,थकवा,भूक न लागणे यांसारख्या लक्षणांचे व्यवस्थापन केले जाते.कर्करोग,हृदयरोग,किडनी फेल्युअर, न्यूरोलॉजिकल आजार (जसे की पार्किन्सन,अल्झायमर),तसेच एचआयव्ही(एड्स) अशा अनेक गंभीर आजारांमध्ये पॅलिएटिव्ह केअरची गरज असते.या सेवेमध्ये फक्त शारीरिक उपचारच नाहीत,तर मानसिक,सामाजिक आणि आध्यात्मिक आधार देखील दिला जातो.अनेक वेळा रुग्णाला भीती,नैराश्य,एकटेपणा किंवा भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते.अशावेळी समुपदेशन खूप महत्त्वाचे ठरते.तसेच कुटुंबीयांनाही मार्गदर्शन केले जाते,कारण ते देखील या परिस्थितीत तणावाखाली असतात.एचआयव्ही अशा अनेक गभीर आजारामध्य पालए कैअरची गरज असते.मध्ये फक्त शारीरिक उपचारच नाहीत,सामाजिक आणि आध्यात्मिक आधार देखील दिला जातो.अनेक वेळा रुग्णाला भीती,नैराश्य,एकटेपणा किंवा भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते.अशावेळी समुपदेशन खूप महत्त्वाचे ठरते.तसेच कुटुंबीयांनाही मार्गदर्शन केले जाते,कारण ते देखील या परिस्थितीत तणावाखाली असतात.पॅलिएटिव्ह केअर टीममध्ये विविध तज्ञांचा समावेश असतो.यातडॉक्टर,नर्स,फिजिओथेरपिस्ट,समुपदेशक,सामाजिक कार्यकर्ते आणि कधी कधी धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक यांचा समावेश असतो.हे सर्वजण मिळून रुग्णासाठी योग्य योजना तयार करतात.प्रत्येक रुग्णाची गरज वेगळी असल्यामुळे उपचारही त्यानुसार बदलतात.वेदना नियंत्रण हा पॅलिएटिव्ह केअरचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.वेदना कमी करण्यासाठी औषधे (जसे की पॅरासिटामॉल,ओपिओइड्स),फिजिकल थेरपी,तसेच रिलॅक्सेशन तंत्रांचा वापर केला जातो.योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात औषधे दिल्यास रुग्णाला मोठा आराम मिळू शकतो.पॅलिएटिव्ह केअर घरी,रुग्णालयात किंवा विशेष केंद्रांमध्ये नेक वेळा रुग्णाला स्वतःच्या सोयीचे आणि (हॉस्पिटल) मध्ये दिली जाऊ शकते.ही सोय.डॉ.साहिल माळी आणि त्यांचे पिताश्री डॉ.राजेश माळी यांनी प्रथमच केली आहे.यापूर्वी केरळ राज्यात आणि महानगरात अशी सुविधा उपलब्ध होती.ती आता प्रथमच कोपरगाव शहरात उपलब्ध होत आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“डॉ.माळी हॉस्पिटलचे “पॅलिएटिव्ह केयर अँड पेनयुनिट” हा कोपरगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.डी.एस.मुळे यांनी व्यक्त केले आहे.अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या रुग्णांना विशेष काळजी आणि वेदनाशामक उपचारांची आवश्यकता असते.ही गरज ओळखून डॉ.माळी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपकरणे व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे रुग्णांना आता पुढील उपचारांसाठी पुणे,मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही”-डॉ.डी.एस.मुळे,कोपरगाव.
डॉ.साहिल माळी यांनी अमेरिकेत आपले शिक्षण पूर्ण करून पुणे येथील प्रसिद्ध रुग्णालय,कोपरगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल आदी ठिकाणी आपली सेवा चोखपणे बजावली आहे.या आधी डॉ.राजेश माळी यांनी गेल्या वीस वर्षापूर्वी आपल्या साई पॉलीक्लिनिकचे सुरुवात केली होती.त्यांनी अल्पावधीतच या क्षेत्रात नाव कमावले आहेआता त्यांचे चिरंजीव या क्षेत्रात उतरले आहे.
डॉ.साहिल माळी यांनी भारतात एम.बी.बी.एस.ची पदवी घेऊन अमेरिकेत फेलोशिप इन पॅलीएटिव्ह मेडिसिन अँड पॅलीएटिव्ह केअर फिजिशयन ची पदवी घेतली आहे.त्यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित वैद्यकीय पथकाद्वारे अत्यवस्थ व गंभीर आजारांची निगा राखली जाणार आहे.आय.सी.यू.मध्ये अत्यवस्थ रुग्णांची वेदना व त्रास कमी करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाने उपचार केले जाणार आहेत.यामध्ये अत्याधुनिक मॉनिटरिंग सिस्टीम,आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि तत्पर सेवा यांचा समावेश आहे.या सुविधेमुळे कोपरगाव व परिसरातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवरच मिळणार असून यामुळे वेळ,खर्च आणि त्रास यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.त्याचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी बालरोगतज्ञ डॉ.अमोल अजमेरे,कान नाक घसा तज्ञ डॉ.रवींद्र कुलकर्णी,आयुर्वेदतज्ञ डॉ.तुषार गलंडे,स्त्री रोगतज्ञ डॉ.योगेश बनकर,रेडियोलॉजिस्ट डॉ.शिरीष मुळे व सुवर्णा माळी,श्रीमती अरुणा माळी,डॉ.भास्कर,डॉ.बंडू शिंदे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

साई पॉलीक्लिनिकचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून नागरिकांकडून या सुविधेचे स्वागत केले जात आहे.



