आरोग्य
…या वैद्यकांनी केल्या हजारहून अधिक मणक्याच्या शस्त्रक्रिया !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात मेंदू व मनकातज्ञ डॉ.प्रसाद उंबरकरांनी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रुग्णाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे हजाराहून अधिक मणक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या असल्याची माहिती हाती आली असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“नागरिकांनी मणक्याचे आरोग्य सांभाळताना योग्य पवित्रा ठेवला पाहिजे,सतत बसून काम केल्यास प्रत्येक अर्ध्या तासाने उठून आपले शरीर हालवायाला हवे,जड वस्तू योग्य पद्धतीने उचलली पाहिजे,सदृढ आरोग्यासाठी नियमित चालणे,योगासने व स्ट्रेचिंगचा समावेश करावां,वजन नियंत्रणात ठेवावे आणि पोषणयुक्त आहार घ्यावा”- डॉ.प्रसाद उंबरकर.एस.जे.एस.हॉस्पिटल,कोपरगाव.
जागतिक मणक्याच्या आरोग्याचे महत्त्व जगाला कळावे आणि मणक्याच्या दुखापती आणि मणक्याच्या आजारांबद्दल जागरूकता पसरवावी यासाठी दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक मणक्याचा दिन साजरा केला जातो.मणक्याला,ज्याला मणक्याचे किंवा कशेरुकाचे स्तंभ असेही म्हणतात.मानवी शरीराच्या मणक्याचे रक्षण करते आणि मध्यवर्ती आधार म्हणून काम करते.मणक्याचे स्नायू स्नायू प्रणालीच्या वेगवेगळ्या भागांना जोडतात आणि एखाद्याला बसण्यास,उभे राहण्यास,चालण्यास,वळण्यास आणि वाकण्यास मदत करतात.तथापि,जर एखाद्याने काळजी घेतली नाही आणि योग्य पवित्रा राखला नाही तर त्याच्या मणक्याचे नुकसान होऊ शकते.पाठीच्या दुखापती आणि मणक्याच्या स्थितीमुळे देखील मणक्याचे नुकसान होऊ शकते.
याबाबत माहिती देताना त्यांनी म्हंटले आहे की,”नागरिकांनी आपले काम करताना योग्य पवित्रा ठेवला पाहिजे,सतत बसून काम केल्यास प्रत्येक अर्ध्या तासाने उठून आपले शरीर हालवायाला हवे,जड वस्तू योग्य पद्धतीने उचलली पाहिजे,सदृढ आरोग्यासाठी नियमित चालणे,योगासने व स्ट्रेचिंगचा समावेश करावां,वजन नियंत्रणात ठेवावे आणि पोषणयुक्त आहार घ्यावा,सर्वांनी “आपला कणा-आपली ताकद” असा संकल्प करून पाठीच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि निरोगी जीवनाचा पाया मजबूत करावा” असे आवाहन डॉ.प्रसाद उंबरकर यांनी या जागतिक मनका शस्त्रक्रिया दिना निमित्ताने शेवटी केले आहे.