आरोग्य
…या केंद्रावर पडणार अचानक छापे,जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
गर्भवती महिलेची गर्भनिदान चाचणी करण्यासाठी सोनोलॉजिस्ट,अल्ट्रासॉनिक क्लिनिकचा आपल्या आर्थिक फायद्यासाठी गैरवापर करणाऱ्यांचा कोपरगाव,राहाता आणि येवला तालुक्यात सुळसुळाट झाला असल्याची व परिणामी स्री-पुरुष जन्मदरात मोठे असंतुलन निर्माण होत असल्याची बातमी ‘न्युजसेवा’ या वेब पोर्टलवर प्रसिध्द होताच याची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी घेतली असून अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींच्या घटत्या जन्मदाच्या पार्श्वभूमीवर गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.याअंतर्गत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर अचानक छापे टाकण्याच्या सूचना दिल्या आहे त्यामुळे या क्षेत्रात गोरखधंदा करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.या निर्णयाचे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींच्या घटत्या जन्मदाच्या पार्श्वभूमीवर गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे व याअंतर्गत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर अचानक छापे टाकण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.त्यामुळे या क्षेत्रात गोरखधंदा करणाऱ्या असामाजिक तत्त्वांत खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,’कोपरगाव शहरातील एका डॉक्टरने कोपरगाव तालुक्यातील महिलेवर चुकीची शस्त्रक्रिया केल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत मागील दोन आठवड्यापूर्वी विविध दलीत संघटनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापासून मोर्चाचे आयोजन करत आरोपी डॉक्टरवर कारवाई करावी व मयत महिलेच्या कुटुंबास न्याय द्यावा अशी मागणी दि.१० जून २०२५ रोजी केली होती.त्यामुळे कोपरगाव तालुका आणि परिसरातील तालुक्यातील महिलांची अवैध गर्भनिदान चाचणी करणारे सोनोलॉजिस्ट,अल्ट्रासॉनिक क्लिनिक चर्चेच्या अग्रस्थानी आल्या आहेत.त्यातून खेड्यातील जनरल प्रॅक्टिशनर (जे.पी.)त्यांची होणारी कमाई डोळे चक्रावून टाकणारी असल्याचे दिसून येत आहे.यात मोठी टोळी कार्यरत असून याचे थेट बीड कनेक्शन असल्याचे दिसून येत आहे.परिणामी समाजात मुलींची संख्या झपाट्याने घटत असून समाजाची विन उसत चालली असल्याचे दिसून येत आसल्याची बातमी २२ जून रोजी प्रसिद्ध केली होती.आजही एक हजार मुलाच्या मागे केवळ ८३०-४० मुली असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे व झपाट्याने कमी होत आहे.एका माहितीनुसार उत्तर नगर जिल्ह्यातील वरील तालुक्यात ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनर हे सोनोलोजिस्ट आणि अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यात दलालांच्या रुपात काम करत असून त्या मोबदल्यात त्यांना एका चाचणीचे २५ ते ३० हजार रुपयांचा मलिदा मिळत असल्याचे उघड केले होते.गर्भवती महिलेची गर्भनिदान चाचणी (सेक्स डिटर्मेशन टेस्ट) गर्भपात आणि गर्भाची दुसरी अवस्था (सेकंड ट्रायमिस्टर)करण्यासाठी सोनोलॉजिस्ट,अल्ट्रासॉनिक क्लिनिकचा सर्रास वापर होताना दिसत आहे.यातून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारत असून ६०-७० हजारांची वरकमाई करत आहेत.मात्र सदर उपचार डॉक्टरच्या सल्ल्याने न घेतल्याने संबधित महिलांचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असतो.काही वेळी संबधित महिलेचा मृत्यू होत असतो.मात्र त्यानंतर सदर रुग्णाला शहरातील रुग्णालयात उपचारर्थ भरती केले जात आहे.त्यावेळी उपचाराला उशीर झालेला असतो परिणामी संबधित महिलेचा मृत्यू ओढवतो.मात्र यात बऱ्याच वेळा बदनामी मात्र शहरातील रुग्णालयावर येत असल्याचे दिसून येत आहे.या अवैध व्यवसायात गावोगाव जनरल प्रॅक्टिशनर (जे.पी.)हे दुवा म्हणून काम करत आहेत.हे लोक संबधित महिलेला कुटुंबाच्या सल्ल्याने एक बीड कनेक्शन असलेले सुमारे ०५ हजार रुपयांचे किट देत असून त्यासाठी राहाता,कोपरगाव,आणि येवला तालुक्यात पूर्व भागात मेडिकल कुप्रसिद्ध आहेत.परिणामी हे रुग्ण या किटचा वापर घरीच करत असून नको असलेला गर्भ काढून टाकत आहे.आणि तो बहुधा मुलीचाच असतो असे दिसून येत आहे.मात्र या किटचे काही दुष्परिणाम असल्याचे दिसून येत आहे.त्याचे दुष्परिणाम झाल्यावर स्त्री रुग्ण शहरातील मोठ्या रुग्णालयात धाव घेत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान हे अवैध काम करणारे सोनोलॉजिस्ट,अल्ट्रासॉनिक क्लिनिकचे संचालक हे राजकीय आपला गोरख धंदा तेजीत आणि व्यवस्थित चालण्यासाठी राजकीय नेत्यांचा आश्रय घेताना दिसून येत असल्याचे उघड केले होते.त्यात एक राहाता येथील प्रसिद्ध रुग्णालय तर येवला पूर्व भागातील एक डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती प्रसिध्दी केली होती.त्या बाबत जिल्हाधिकारी यांनी मागील आठवड्यात कोपरगाव तालुक्यात भेट दिली होती.याबाबत नागरिकांनी याबाबत तक्रार केल्या होत्या.त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत लिंग गुणोत्तर,साथरोग परिस्थिती,जन्म-मृत्यू नोंदणी व क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत सखोल चर्चा करण्यात आली त्यावेळी हे आदेश दिले आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक बैठक घेतली असून त्यांनी संपन्न झालेल्या या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींच्या घटत्या जन्मदाच्या पार्श्वभूमीवर गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे व याअंतर्गत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर अचानक छापे टाकण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत लिंग गुणोत्तर,साथरोग परिस्थिती,जन्म-मृत्यू नोंदणी व क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.गर्भलिंग चाचणीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची अचानक भेटी देण्याचे त्यांनी सांगितले आहे.त्यावेळी विविध गर्भलिंग केंद्रे तपासणी करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करणे,संशयास्पद गर्भपातप्रकरणी सखोल चौकशी करणे,गरोदर मातांचा नियमित पाठपुरावा,लिंगनिदानविषयी जनजागृती मोहिमा राबविणे,गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित देखरेख ठेवणे अशा उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी शेवटी दिले आहेत.