जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात पालिका व्यवस्थापनाचा उडवला नागरिकांनी फज्जा !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जगात कोरोना विषाणूने कहर उडवून लाखो नागरिकांचा बळी घेतला असताना देशातील दिल्ली पासून गल्ली पर्यंतचे सर्वच नेते कोरोनाला आपल्या पासून दूर ठेवण्यासाठी “सामाजिक अंतर” पाळण्याचे आवाहन करीत असताना नागरिकांना अद्यापही त्याचे गांभीर्य समजण्यास तयार नसल्याने प्रशासन प्रचंड तणावात आले असून त्यांनी आता कोपरगाव शहरात आठवड्यातून तीन दिवस भाजीपाला व किराण्याला देण्याचा घेतलेला निर्णय बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहर कुलुपबंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची चालू असलेली धरपकड संभाजी चौकात दिसत आहे.

राज्यात कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६३५ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ३४ जणांनी आपले प्राण सोडले आहेत.मुंबई पाठोपाठ पुण्यातही करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे चोवीस तासात आणखी तीन बळी गेले आहेत. करोना सदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्येच एका ४८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.नगर जिल्ह्यात १७ रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन तणावात आले आहे.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.

शहर कुलुपबंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांची केलेल्या पायमल्ली बाबत प्रशासनाची चालू असलेली तातडीची चर्चा संभाजी चौकात दिसत आहे.

राज्यात कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६३५ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ३४ जणांनी आपले प्राण सोडले आहेत.मुंबई पाठोपाठ पुण्यातही करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे चोवीस तासात आणखी तीन बळी गेले आहेत. करोना सदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्येच एका ४८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.नगर जिल्ह्यात १७ रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन तणावात आले आहे.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.कोपरगाव नगरपरिषदने नागरिकांचा या बेदरकार प्रवृत्तीमुळे आधी दिवसाआड भाजीपाला विकण्याची मुभा दिली होती.मात्र नागरिकांच्या सामाजिक अंतर न पाळण्याच्या या प्रवृत्तीमुळे आठवड्यातून तीन दिवस भाजीपाला विक्रीला मुदत दिली होती.त्यात किराण्याचा समावेश होता.मात्र त्यातून काही सकारात्मक परिणाम पुढे येण्याऐवजी घडले उलटेच.

आज सकाळी आठ नंतर कोपरगाव शहरातील संभाजी महाराज चौक व खडकी नाका परिसरात नागरिकांनी व महिलांनी भाजीपल्याला एकच गर्दी केली होती. एका कार्यक्रमाला कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे एकत्र आले असताना त्यांना या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी केलेली गर्दी आढळून आली त्यामुळे त्यांना डोक्याला हात लावायचा अनास्था प्रसंग आला आहे.नगराध्यक्ष वहाडणे यांनी तर अधिकाऱ्यांना तातडीने यावर उपाय शोधा व कोरोना कोपरगाव शहरात ठाण मांडण्याआधी हि गर्दी कमी करण्याची सूचना केली आहे. त्याला मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनीही पोलीस निरीक्षक मानगावकर यांचेशी चर्चा करून होकार दिला असून त्याची अंमलबजावणी करण्याची शक्यता वाढली आहे.त्यामुळे नागरिकांच्या बेपर्वाईमूळे आता आठवड्यातून कदाचित एक दिवसच हि संधी काही तासासाठी मिळू शकत असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close