आरोग्य
कोपरगाव तालुक्यात ४५८७ “होम कोरोंटाईन” नागरिक ?
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगभरात कोरोना विषाणूने कहर उडवून दिला असून अमेरिका व इटली,स्पेन आदी देशातही या विषाणूने पीडित रुणांची आता हजारोच्या संख्येत वाढ होत असताना आपल्या देशात नियंत्रणात म्हटली पाहिजे या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात अद्याप पर्यंत होम कोरोंटाईन मधील संख्येत बरीच मोठी वाढ झाली असून ती एवढी झाली असून तालुक्यात हिच आकडेवारी ४ हजार ५८७ अशी असून या पैकी कोपरगाव शहरात यातील ४७७ इतकी झाल्याने नागरिकांत काळजीचा सूर उमटला आहे.या पार्श्वभूमीवर अधिक सावधानता घेण्याची गरज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते व डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी व्यक्त केली आहे.
जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. रोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. तर शेकडो लोकांची मृत्यू होत आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही दिवसातील जगभरातील मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा व्हायरस अतिशय भयंकर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जगभरात ७ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मृतांची संख्या ऐकून धक्काच बसेल. मृतांनी तर ३१ हजारचा आकडा पार केला आहे.
जगभरात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या रविवारपर्यंत ३१ हजार ४१२ इतकी होती. हा आकडा २४ तासात वाढला असून सद्यस्थितीनुसार जगभरात ३३ हजार ९७६ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासाच ही संख्या २ हजार ५६४ ने वाढली आहे.कोरोना बाधितांची संख्या आतापर्यंत जगात ७ लाख २२ हजार १९६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही आकडेवारी पाहून अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
त्या तुलनेने नगर जिल्हा व कोपरगाव तालुका अद्याप तरी नियंत्रणात दिसल्याने दिसत आहे.मात्र मोठ्या शहराकडून आपल्या गावाकडे येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांच्याकडून सरकारने २२ फेब्रुवारी पासून किती नागरिकांनी आपल्या गावाकडे धाव घेतली आहे याची आकडेवारी घेतली असता,” त्यांनी आत्तापर्यंत कोपरगाव तालुक्यातील ७९ गावात ४ हजार ५८७ नागरिकांनी आपल्या मूळ गावी धाव घेतली असून तालुका प्रशासनाने त्यांना “होम कोरोंटाईन” शिक्के त्यांच्या हातावर मारले असून त्यांची नोंद केली आहे
कोपरगाव शहरात कोपरगाव ग्रामीण रुग्णालय हद्दीत बाहेरगावातून आलेल्या नागरिकांची आकडेवारी पुढील प्रमाणे जिल्ह्याबाहेरून आलेले नागरिक ४१७,राज्याबाहेरून आलेले नागरिक १६,देशाबाहेरून ४४ एकूण कोरोंटाईंनचे शिक्के मारलेले नागरिक ४७७ आहे.
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका बाहेरून -७,जिल्ह्याबाहेरून -६६४,राज्याबाहेरून-४,देशाबाहेरून-६,एकूण शिक्के-६७०,दहिगाव बोलका-तालुक्या बाहेरून ३४,जिल्ह्याबाहेरून-३४८,राज्याबाहेरून-९,देशाबाहेरून-३ एकूण शिक्के मारलेले नागरिक-२७५,पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीत तालुका बाहेरून-५,जिल्हा बाहेरून -८९९,राज्याबाहेरून-७,देशाबाहेरून-२,एकूण शिक्के मारलेले नागरिक ९१३,संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका बाहेरुन आलेले नागरिक -१,जिल्हा बाहेरून-४३८,राज्याबाहेरून-५,देशाबाहेरून-९, एकूण शिक्के मारलेले नागरिक ४५२,टाकळी-ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीत तालुका बाहेरून आलेले नागरिक -६८,जिल्हा बाहेरून-६९०, राज्याबाहेरून-५५,देशाबाहेरून-६,एकूण शिक्के मारलेले नागरिक-३२४,वारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत जिल्हा बाहेरून-१०२,राज्याबाहेरून-३,देशाबाहेरून-१,एकूण शिक्के मारलेले नागिरक १०६,असे एकूण ४ हजार ५८७ नागरिक बाहेरून आले आहे.जी संख्या चिंताजनक मानली पाहिजे व त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.अद्याप धोक्याचा कालावधी संपलेला नाही.नागरिकांना आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागणार आहे.बेफिकिरी त्यांच्या कुटुंबाला,गावाला व परिसराला पर्यायाने तालुक्याला महागात पडू शकते असा इशारा कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरगाव शहराचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी दिला आहे.