आरोग्य
डॉक्टरांच्या…त्या मागणीची तहसीलदारांनी घेतली दखल !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वैद्यकामध्ये रोगनिदान, रोगाच्या स्थानाचे, स्थितीचे व विस्ताराचे अचूक मापन आणि उपचार यांसाठी अनेक प्रकारच्या उपकरणांचा उपयोग हि बाब अत्यंत महत्वाची मानली जात असताना व त्याचा जिल्ह्यात पूर्ण अभाव असताना काही अधिकाऱ्यांनी कोरोना या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी रुग्णालये चालू करण्याचे आदेश दिल्याने काही खाजगी डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले होते त्याबाबत जनशक्ती न्यूजने सर्वप्रथम आवाज उठवला होता त्याची दखल कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी घेतली असून संरक्षक साहित्या बाबतची बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे कोपरगाव डॉक्टर असोसिएशनने समाधान व्यक्त केले आहे.
आमच्या प्रतिनिधीने इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव शाखेचे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या शिष्टमंडळाने तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेतली असून या बाबत सविस्तर चर्चा केली आहे.व पी.पी.ई. बाबतचे महत्व समजावून दिले आहे.गर्दीच्या कालखंडात अन्य रुग्णावर उपचार करताना कदाचित कोरोनाचा संसर्ग असलेला रुग्ण आला तर त्याआची लागण गर्दी केलेल्या रुग्णाला तर होईलच पण आमचे भविष्य पी.पी.ई. अभावी जोखमीच्या कचाट्यात सापडेल असे समजावले आहे-डॉ.मयूर जोर्वेकर,अध्यक्ष इंडियन मेडिकल असोशिअशन,कोपरगाव.
देशात कोरोना विषाणूने कहर उडवला असून महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली होती. मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील करोनाग्रसतांची संख्या १७७ झाली आहे. आज सकाळीच मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाल्याचं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलं होतं. मात्र आता ही संख्या १७७ वर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा असं आवाहनही करण्यात आलं आहे. तरीही महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.या बाबत नगर जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यानी खाजगी वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनावर उपचार करण्याचे आवाहन केले होते.मात्र काही खाजगी डॉक्टरांनी याला हरकत घेतली होती.व वैयक्तिक संरक्षक साहित्य (पी.पी.ई.) असल्याशिवाय उपचाराला नाव न छापण्याच्या अटीवर नकार दिला होता. आज लाखो उपकरणे असताना कोरोना विषाणू तपासणीचे किट नसताना या रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना यात लोटणे कितपत शहाणपणाचे आहे असा प्रश्न निर्माण केला होता.व पी.पी.ई. संच शिवाय कोरोना विषाणूची लागण असलेल्या रुग्णावर उपचार करणे जोखमीचे असल्याचे म्हटले होते.
या बाबत कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आज या बाबत आपले म्हणणे एका दृकश्राव्य चलचित्रणातून मांडले असून खाजगी डॉक्टरांच्या या मागणी बाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले असल्याचे म्हटलेले आहे.या बाबत या व्हिडिओत त्यांनी अफवा पसरविणाऱ्या बाबत कडक समज दिले असून नागरिकांनी सामाजिक संकेतस्थळावर अफवा पसरू नये असे आवाहन केले आहे.
दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव शाखेचे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या शिष्टमंडळाने तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेतली असून या बाबत सविस्तर चर्चा केली आहे.व पी.पी.ई. बाबतचे महत्व समजावून दिले आहे.गर्दीच्या कालखंडात अन्य रुग्णावर उपचार करताना कदाचित कोरोनाचा संसर्ग असलेला रुग्ण आला तर त्याआची लागण गर्दी केलेल्या रुग्णाला तर होईलच पण आमचे भविष्य जोखमीच्या कचाट्यात सापडेल असे समजावले आहे.व तातडीची रुग्णसेवा सुरु करणेच योग्य राहील असे लक्षात आणून दिले आहे.
सदर प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे कोपरगाव शाखेचे अध्यक्ष मयूर जोर्वेकर,जेष्ठ डॉक्टर दत्तात्रय मूळे, डॉ.अजय गर्जे,डॉ.हेमंत राठी, डॉ.शंतनू सरवार,डॉ.योगेश बनकर,डॉ.कृष्णा फुलसुंदर,आदी मान्यवर उपस्थित होते.