जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

धारणगावात प्रतिबंधात्मक औषध फवारणी सुरु

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

धारणगाव-(प्रतिनिधी)

कोपरंगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंर्तगत जंतुनाशकांची फवारणी नुकतीच सरपंच नानासाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली होती. मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील करोनाग्रसतांची संख्या १७७ झाली आहे. आज सकाळीच मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाल्याचं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलं होतं. मात्र आता ही संख्या १७७ वर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा असं आवाहनही करण्यात आलं आहे. तरीही महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

या पार्श्वभूमीवर या विषाणूंचा प्रतिबंध करणे हि अवघड जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर येऊन पडली आहे.त्याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे.त्यामुळे धारणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच नानासाहेब चौधरी यांनी या बाबत दक्ष राहून नुकतीच गावात प्रतींबंधात्मक औषधांची फवारणी सुरु केली आहे.त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ ननवरे,ग्रामसेवक सौ.अहिरे,नाना चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close