आरोग्य
…या शाळांमधून डेंग्यू व मलेरियाविषयी मार्गदर्शन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कोकमठाण येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्राच्यावतीने कोकमठाण परिसरातील विविध शाळांमध्ये डेंग्यू व मलेरिया या आजाराविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या मोहिमेमुळे जनजागृती करण्यात आल्याने परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
“सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार होऊन त्यावर डासांचा उपद्रव वाढतो.डेंग्यू आणि मलेरियासारखे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असतात.याचा जनजीवनावर विपरीत परिणाम होतो.आरोग्याच्यादृष्टीने या गोष्टी घातक आहे”-डॉ.पारखे,संवत्सर ता.कोपरगाव.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रातील टीमने ही मोहीम राबविली.कोकमठाण परिसरातील जिल्हा परिषद शाळांपैकी कोकमठाण गावठाण शाळा,पुणतांबारोड शाळा,शामवाडी शाळा,माळवाडी शाळा या शाळांमध्ये सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी डेंग्यू व मलेरिया या संसर्गजन्य आजाराविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली.पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू व मलेरियासह किटकजन्य,जलजन्य,चिकनगुनिया अशा वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार होऊन त्यावर डासांचा उपद्रव वाढतो.डेंग्यू आणि मलेरियासारखे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असतात.याचा जनजीवनावर विपरीत परिणाम होतो.आरोग्याच्यादृष्टीने या गोष्टी घातक आहेत असे सांगून डॉ.पारखे यांनी संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना व आजार टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.