कोपरगाव तालुका
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने मराठा वधू-वर मेळावा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने मराठा वधू-वर मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक धट यांनी एका प्रसिद्धी पत्राकांनव्ये केले आहे.
संपर्कासाठी नाव व क्रमांक.-दिपक धट पाटील जिल्हा अध्यक्ष-७७७००७३४३४,बापूसाहेब सुराळकर जिल्हा उपाध्यक्ष मो.९८६०४७४४४०,मो.सोमनाथ राशिनकर तालुका सचिव-मो.८४३२५८७५७५,रवि ठोंबरे तालुका संघटक-मो.९६०७२११२१४.
मराठा समाजाच्या परिचयाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आणि विवाहासारखा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मागील काही वर्षांपासून अनेक संस्था वधु-वर परिचय मेळावा घेत आहे.मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो विवाह जुळले असून जुळत आहेत.या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नवजात वधु-वरासंह विधवा महिला व विधुर इच्छुकांना नाव नोंदणी करावी लागणार आहे.तर वधु-वरांच्या परिचयाबाबत ठिकाण व वेळ नंतर कळविली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या परिचय मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक धट यांनी एका प्रसिद्धी पत्राकानव्ये केले आहे.त्यासाठी एक पासपोर्ट आकारातील फोटो,आपल्या परिचय पत्रासह द्यावे व त्यासाठी पदाधिकारी यांच्या खालील भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.