जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शासकीय योजनांची अंमलबजावणीतून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य होणार-गटविकास अधिकारी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

‘‘ग्रामविकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या सर्व योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी केल्यास शाश्वत विकासाचे उद्दिष्ट लवकरात लवकर आपण साध्य करू शकतो’’ असे प्रतिपादन कोपरगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी नुकतेच व्यक्त केले आहे.

‘‘नियोजन हा विकास प्रक्रियेचा गाभा आहे.विकासाचा प्राधान्यक्रम अभ्यासपूर्वक निश्चित करता येणे ही काळाची गरज आहे.कारण अनियोजित विकासामुळे निर्माण झालेल्या समस्या भविष्यासाठी त्रासदायक ठरतात’’-सचिन सूर्यवंशी,गटविकास अधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामविकास आराखडा २०२३-२४ संदर्भात कोपरगाव तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच जंगली महाराज आश्रम,कोकमठाण येथे पार पडली.त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.सूर्यवंशी बोलत होते.

याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,प्रशांत तोरवणे,तालुका समन्वयक नितीन मोरे,सचिन बोरुडे तसचे ‘यशदा’ या संस्थेचे प्रशिक्षक विलास जोंधळे आणि नामदेव घुले उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘‘नियोजन हा विकास प्रक्रियेचा गाभा आहे.विकासाचा प्राधान्यक्रम अभ्यासपूर्वक निश्चित करता येणे ही काळाची गरज आहे.कारण अनियोजित विकासामुळे निर्माण झालेल्या समस्या भविष्यासाठी त्रासदायक ठरतात.’’

यशदा संस्थेच्या प्रशिक्षकांनी ग्रामविकास आराखड्याशी संबंधित विविध घटकांचे सादरीकरण केले.संयुक्त राष्ट्राद्वारे निर्धारित करण्यात आलेली शाश्वत विकासाची सर्व १७ उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाद्वारे निश्चित केलेल्या सर्व संकल्पना यावेळी प्रशिक्षणार्थींना समजावून सांगण्यात आल्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close