आंदोलन
..या पक्षाचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दुधाला, कांद्याला भाव,अतिवृष्टीतील नुकसान भरपाई, पीकविमा व कृषी निविष्ठांवरील जीएसटी रद्द करण्यासारख्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्या १५ सप्टेंबर रोजी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नगर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“संपूर्ण कर्जमाफी,कांद्याची मुक्त निर्यात,कांदा-दुधाला अनुदान,कापसाला प्रोत्साहन, द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष पॅकेज,कृषी निविष्ठांवरील जीएसटी रद्द करणे,वाढीव हमीभाव,भाजीपाला पिकांना मदत,बोगस खतबियाणे विक्रीवर कारवाई आदी मागण्या सरकारकडे मांडल्या जाणार आहे”-संदिप वर्पे,कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

शेतकरी कर्जमाफी करू,असं आश्वासन महायुतीनं निवडणुकीआधी भाजप सरकारने दिलं होतं.त्यामुळे शेतकरी कर्जमाफीबाबत राज्यात सातत्यानं चर्चा होत आहे.शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे.तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.या समितीच्या शिफारशीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांच्या कर्जाचे वर्गीकरण करून कर्जमुक्तीचा सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जूनमध्ये अमरावती जिल्ह्यात दिली होती.त्याला आता तीन महिने झाले आहे.कर्जमाफी दूरच पण कांद्याचे दर रसातळाला गेले आहे.सोयाबीनला भाव द्यायला सरकार तयार नाही.त्याविरोधात सर्वप्रथम श्रीरामपुरात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी आवाज उठवला होता.त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आ.बच्चू कडू यांनी मोर्चा उघडला होता.तरीही सरकार दाद द्यायला तयार नाही.त्यामुळे या विरोधात आता राज्याच्या विरोधी पक्षांनी नाशिक येथे मोर्चा उघडला आहे व या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार आहे.
त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे,खा.सुप्रिया सुळे,माजी मंत्री जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे,आ.जितेंद्र आव्हाड,राज्य प्रभारी आ.रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

संपूर्ण कर्जमाफी,कांद्याची मुक्त निर्यात,कांदा-दुधाला अनुदान,कापसाला प्रोत्साहन, द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष पॅकेज,कृषी निविष्ठांवरील जीएसटी रद्द करणे,वाढीव हमीभाव,भाजीपाला पिकांना मदत,बोगस खतबियाणे विक्रीवर कारवाई आदी मागण्या सरकारकडे मांडल्या जाणार आहेत.त्यामुळे या मोर्चाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.या मोर्चाला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष बापू रांधवणे,कार्याध्यक्ष तानाजी जाधव,ॲड. दिलीप लासुरे,ॲड.रमेश गव्हाणे,सुरेश आसने, सुनिल वर्षे आदीं उपस्थित होते.