कोपरगाव तालुका
…या शहरातील जनावरांचा आठवडे बाजार बंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्ह्यात फऱ्या आणि लंपी या साथीच्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने ती आणखी वाढू नये म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील दर सोमवारी भरणारा जनावरांचा आठवडे बाजार पुढील आदेश होईपर्यंत या कालावधीसाठी बंद ठेवला असल्याची माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीचे प्रशासक व सहाय्यक निबंधक एन.जी.ठोंबळ यांनी दिली आहे.
“फऱ्या आणि लंपी या रोगाचा प्रसार होण्यापासून वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जा.क्रं.आ.व्या.म.पू /कार्या./१९(अ)/१४५५/२०२२ दि.२४ ऑगष्ट रोजी फऱ्या आणि लंपी या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी कोपरगाव येथील प्रत्येक सोमवारी भरणारा जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्याची सर्व व्यापारी शेतकरी यांनी दखल घ्यावी”-एन.जी.ठोंबळ,प्रशासक,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.
फऱ्या हा जनावरांना अथवा प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा एक सांसर्गिक रोग आहे.विशेषकरून धष्टपुष्ट जनावरांना व २-३ वर्षे वयाच्या लहान जनावरांना होतो.हा रोग ‘क्लोस्टिडियम शोव्हिया’ या विषाणूंमुळे होतो.तर पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते.या दिवसात अनेक आजारांचा प्रसार होत असतो.दरम्यान नगर जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रसार झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.खरीप हंगामाच्या दिवसामध्ये जनावरे आजारी होत असल्याने पशुपालक चिंतेत आहेत.
दरम्यान या आजाराची लस उपलब्ध नसल्याने पशुपालकांची चिंता अधिक वाढली आहे.जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानेही नियोजन केले असून गावागावात शिबिरे आयोजित केले आहे.दरम्यान या रोगाचा प्रसार होण्यापासून वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जा.क्रं.आ.व्या.म.पू /कार्या./१९(अ)/१४५५/२०२२ दि.२४ ऑगष्ट रोजी फऱ्या आणि लंपी या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी कोपरगाव येथील प्रत्येक सोमवारी भरणारा जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्याची सर्व व्यापारी शेतकरी यांनी दखल घ्यावी व आपल्या जनावरांना फऱ्या व लंपी या आजारापासून वाचण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक एन.जी.ठोंबळ व सचिव नानासाहेब रनशूर यांनी केले आहे.