कोपरगाव तालुका
…या महाविद्यालयात ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरम’ची स्थापना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैय्या महाविद्यालयात ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरम’ची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता,कौशल्यवद्धीसाठी,विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यासाठीचे प्रयत्न इंडस्ट्री ॲकेडेमिया फोरमच्या माध्यमातून केले जातील.तसेच औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या एकत्रित सहभागातून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रमांचे नियोजन करणे हे इंडस्ट्री अकॅडेमिया फोरमचे उद्दिष्ट आहे”-डॉ.बी.एस.यादव,प्राचार्य,के.जे.सोमैय्या महाविद्यालय कोपरगाव.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी केंद्रित रोजगाराभिमुख अनेक उपक्रम प्रत्येक वर्षी घेतले जातात.औद्योगिक क्षेत्रात रोजगाराची वाढती मागणी लक्षात घेता महाविद्यालय स्तरावर ‘इंडस्ट्री अकॅडेमिया फोरम’ची स्थापना करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे.
वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराचा कल बघता निश्चितच या फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने या फोरमची स्थापना करण्यात आली आहे.औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ तसेच महाविद्यालयातील विद्वान प्राध्यापकांच्या एकत्रित विचाराने विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम आगामी काळात राबविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकासाबरोबरच रोजगार क्षमता व कार्य कुशलता वृद्धिगत करण्यासाठी पाठ्यक्रमाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्य विकसित होतील या उद्देशाने या फोरमची ची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीच्या सभेसाठी औद्योगिक क्षेत्रातील तसेच शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ व उच्चपदस्थ मान्यवर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.व्ही.सी.ठाणगे,या समितीचे समन्वयक डॉ.बी.बी.भोसले,डॉ.एस.आर.पगारे,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.संजय दवंगे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड,एन.सी. सी.ऑफीसर डॉ.एन.जी.शिंदे व प्रा.आकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.