जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

कोपरगावात पुन्हा लाठी प्रसाद सुरु,संचार बंदी कायम !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासनाने अद्याप संचार बंदी उठवलेली नाही तरीही आज नागरिक शहरात मोठ्या संख्येने येत असल्याचे पाहून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी बस स्थानक चौकात व अन्यत्र आपल्या सहकाऱ्यांच्या विविध ठिकाणी पथकांना कार्यरत करून बेताल नागरिकांना लाठी प्रसाद वाटप सुरु केल्याने अनेकांची पंचाईत झाल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान आज कोणते व्यवसाय चालू करायचे व कोणते व्यवसाय बंद करायचे याची यादीच राज्य सरकारने जाहीर केली असली तरी कोपरगाव शहर हे रेड झोन मध्ये येत असल्याने हि सवलत कोपरगाव शहरास लागू नाही या बाबत आज अधिसूचना निघण्याचा अंदाज जबाबदार अधिकऱ्याने व्यक्त केला आहे.कोपरगाव शहरात हि टाळेबंदी किमान तीन मे पर्यंत सुरु राहण्याचे संकेत आहेत.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५३ ने वाढून ती १७ हजार ३५७ इतकी झाली असून ५६० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४ हजार २०० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २२३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.कोपरगावात तर दोन जेष्ठ महिलांचा या साथीत बळी गेल्याने त्याचे गांभीर्य अजून वाढले आहे.हि जिल्ह्यात सर्वाधीक संख्या आहे.

त्यामुळे तालुका प्रशासन व पोलिस यंत्रणा खूपच सजग झाली आहे.ते कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाही.लक्ष्मीनगर येथील अठरा जण आरोग्य अधिकाऱ्यांच्या निगराणीत आहेत त्यातच लक्ष्मीनगर येथे व करंजीत आणखी एक प्रत्येकी संशयित रुग्ण आढळले होते मात्र त्यांचे अहवाल नकारात्मक आल्याने तालुका प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकलेला असतानाच आता पुन्हा मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत एक महिला व दोन पुरुष रुग्ण संशयित आढळले आहे.त्यामुळे प्रशासन तणावात आले आहे.त्यांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलकडे तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे.त्यामुळे अधिकची जोखीम वाढू नये यासाठी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,तालुक्याचे तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,अनिल कटके आदी प्रयत्नशील आहे.त्यामुळे आजची लाठी प्रसाद मोहीम राबविण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close