कोपरगाव तालुका
ध्वनी प्रदूषण गंभीर समस्या,कोपरगावात बैठक संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव आदी सणाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणावर मात करण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कोपरगाव तालुक्यातील सर्व डीजे चालक-मालक व बँड पथक,चालक-मालक यांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली असून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.
ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्य व प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो.ध्वनीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढू शकते,रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार जडू शकतात.तसेच लक्ष विचलित होते,चिडचिड होते,कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो.सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाही येतो या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हि बैठक संपन्न झाली आहे.
ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्य व प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो.ध्वनीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढू शकते,रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार जडू शकतात.तसेच लक्ष विचलित होते,चिडचिड होते,कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो.सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाही येतो.आपल्याकडील बसचालकांना ते चालवीत असलेल्या आणि अन्य वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण अनेक वर्षे सहन करावे लागते. त्यामुळे अशा चालकांना बहिरेपणा आल्याची अनेक उदाहरणे आहेत.वाढलेल्या ध्वनीच्या तीव्रतेमुळे अन्न मिळविण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे काही प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो, प्रजननक्षमता व दिशा ओळखण्याच्या क्षमता यांच्यात बदल झाल्यामुळे ते कायमचे बहिरे होतात.या मुले विविध याचिकांच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.त्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला अधिकार दिले आहेत.त्यामुळे हि बैठक संपन्न झाली आहे.
गेली दोन वर्षे कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे गणेशोत्सव निर्बंधामध्ये साजरा करण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार हे ओघाने आले आहे.त्यासाठीची अनेक गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे.या गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा व पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजीपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या सदस्यांची बैठक ठेवण्यात येणार आहे.मात्र तत्पूर्वी डी.जे.चालकांची बैठक संपन्न झाली आहे.त्यावेळी त्यांना समाजातील विविध घटकाना अपायकारक ठरणाऱ्या विविध सूचना दिल्या आहेत.