अपघात
गळीताच्या ऊसास आग,मोठे नुकसान !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण ३० कि.मी.अंतरावर असलेल्या चासनळी शिवारात गट क्रं.२६/२ मधील गळीतास असलेल्या ऊसास अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा गुन्हा फिर्यादी शेतकरी प्रकाश भाऊसाहेब गाडे (वय-५९) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने चासनळीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी शेतकरी प्रकाश गाडे यांच्या गट क्रं.२६/२ मधील गळीतास आलेला ऊसास आज दुपारी १.३० वाजेच्या सूमारास आग लागली असल्याची खबर त्यांच्या पुतणे न निखिल गाडे यांनी फोनवरून दिली होती.त्यानंतर त्यांना आपल्या भाऊ विजय गाडे यांचाही पाठोपाठ भ्रमणध्वनी आला होता.त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
वर्तमानात दुष्काळ सदृश स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.जमिनीची भूजल पातळी खोलवर गेली आहे.त्यामुळे रब्बी पिके स्वतः काढण्यासाठी मजुरांना आणि आपला गळीतास आलेला ऊस तालुक्यातील सहकारी कारखाने कधी एकदा तोडून नेतात अशी विंनवणी करताना दिसत आहे.त्यातच कोपरगाव तालुक्यात ऊस गळीत हंगाम संपण्याच्या तयारीत आहे.तर दुसरीकडे आपल्या गळितास आलेल्या उसाच्या भरवशावर शेतकरी आपल्या इमले बांधत आहे.त्यातच नैसर्गिक आपत्ती आली किंवा कृत्रिम रित्या कोणी ऊसास आग लावली तर काय होईल अशी कल्पना करवत नाही.मात्र अशी दुर्दैवी घटना उघड झाली असून यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी शेतकरी प्रकाश गाडे यांच्या भाळी दुर्दैवाने आली आहे.त्याच्या गट क्रं.२६/२ मधील गळीतास आलेला ऊसास आज दुपारी १.३० वाजेच्या सूमारास आग लागली असल्याची खबर त्यांच्या पुतणे न निखिल गाडे यांनी फोनवरून दिली होती.त्यानंतर त्यांना आपल्या भाऊ विजय गाडे यांचाही पाठोपाठ भ्रमणध्वनी आला होता.त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.त्यानंतर त्यानी प्रसंगावधान राखून आपला जवळच असलेला एक एकर गहू वाचविण्यासाठी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्यास फोन करून अग्निशामक गाडी बोलावून घेतली होती त्यात त्यांनी गहू वाचविल असला तरी या आगीत त्यांचा सुमारे ४५ हजारांचा ऊस त्यातील ठिबक सिंचनासह जळून खाक झाला आहे.त्यांनी घटनेपूर्वी अवघे पाच मिनिटं आपल्या ऊसाची पाहणी केली होती.ते आपल्या घरी जात नाही तोच त्यांना दूरध्वनी आला होता.त्यामुळे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह पो.हे.कॉ.संदीप बोटे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३८/२०२४ भा.द.वि.कलमं ४३५ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बोटे हे करत आहेत.