शैक्षणिक
राज्यस्तरीय विझ किड्स स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक कोकमठाण शिवारात असललेल्या समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त स्कूलमध्ये राज्यस्तरीय विझ किड्स (व्यक्तिमत्त्व विकास) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर राज्यस्तरीय स्पर्धेला महाराष्ट्रातुन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
वरिष्ठ गटात साईल हसे श्रीरामपूर,श्रेया लिंगायत नाशिक रोड,आणि वृषाली कानीचे नाशिक यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला तर कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक प्रथमेश भट्टड कोपरगाव,द्वितीय क्रमांक आदिती जोरी अहमदनगर आणि तृतीय क्रमांक अवनी नरवाडे कोपरगाव यांना मिळाला आहे.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबर रोजी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालित सहकार उद्यमी व समता महिला बचत गट आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या बारामती येथील भीमथडी यात्रेच्या संयोजिका सुनंदा पवार यांच्या हस्ते बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन उत्साहात संपन्न झाला आहे.वरिष्ठ व कनिष्ठ गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व सन्मानपत्र,व्दितीय पारितोषिक ५ हजार रुपये व सन्मानपत्र आणि तृतीय पारितोषक ३ हजार रुपये व सन्मानपत्र देण्यात आले आहे.
वरिष्ठ गटात साईल हसे श्रीरामपूर,श्रेया लिंगायत नाशिक रोड,आणि वृषाली कानीचे नाशिक यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला तर कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक प्रथमेश भट्टड कोपरगाव,द्वितीय क्रमांक आदिती जोरी अहमदनगर आणि तृतीय क्रमांक अवनी नरवाडे कोपरगाव यांना मिळाला आहे.या दोन्ही गटांसाठी व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ प्रतिभा पाटील,डॉ.आस्था तिरमखे,मिस बहार शेख आणि डॉ.राधिका वाघ यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण करून परीक्षकाची भूमिका पार पाडली आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुनंदा पवार,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश कोयटे,नाशिक येथील विसडम एक्सट्राच्या संचालिका दिपाली चांडक,सहकार उद्यमीच्या अध्यक्षा अंजली पाटील,समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे,स्कूलच्या विश्वस्त स्वाती कोयटे,शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन,उपप्राचार्य समीर अत्तार आदींनी राज्यस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.बक्षीस वितरण समारंभाचे सुत्रसंचलन उपप्राचार्य समीर अत्तार यांनी केले तर शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.