जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

फेरीवाला धोरण राबविण्यासाठी कोपरगावात बैठक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार नगर पथ विक्रेता समिती गठीत करणे बाबत सूचित करण्यात आले होते.या अनुषंगाने शासन निर्णय क्रं.दि.२१ ऑक्टोंबर २०१३ चा आधार घेवून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील पथ विक्रेत्यांच्या सर्वेक्षण कामी नगर पथ विक्रेता समिती दिनांक २५ जुलै २०१९ रोजी गठीत करण्यात आलेली आहे.त्यानुसार कोपरगावात या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला फेरीवाल्या नागरिकांसह नगरसेवक हितचिंतक आदींनी उपस्थितीत राहावे असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे.

राज्याने आपल्या अखत्यारितील महापालिकांना त्यांचे धोरण आखण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.त्यानुसार या धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली असून कोपरगाव शहरातील कोपरगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न लक्षात घेऊन,तसेच रहदारीला होणाऱ्या अडथळा कमी करण्याच्या उद्देशाने विक्री ना-विक्री प्रक्षेत्र ठरविणे,नगर पथ विक्रेता ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र वाटप,शुल्क व आकार,कल्याणकारी योजनांचा लाभ मिळून देणे आदी अनुषंगिक बाबीच्या नियोजना करिता सदर समितीची बैठक आयोजित केली आहे”-शांताराम गोसावी मुख्याधिकारी कोपरगाव नगर परिषद.

महानगरातील फेरीवाल्यांची अनागोंदीला आळा घालण्यासाठी रस्ते,फूटपाथ व्यापणाऱ्या फेरीवाल्यांचे नियमन करण्याची गरज सन १९८३ मध्ये सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली.त्यावर केंद्र सरकारला सर्वंकष राष्ट्रीय फेरीवाला धोरण तयार करण्याचे आदेश,कोर्टाने दिले.कोर्ट-कज्जे,राजकीय पक्षांची मतमतांतरे यातून केंद्राने राज्यांशी चर्चा करून २००४ मध्ये धोरणाची महूर्तमेढ रोवली.राजकीय पक्षाकडून त्यातील असंख्य तरतुदींवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने २००९ मध्ये सुधारित धोरण तयार झाले.कोर्टाने धोरणाचा कायदा बनविण्याचे आदेश दिल्यानंतर त्यासाठी तब्बल २७ वर्षे लागली.अखेर २०१२ मध्ये लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले.लोकसभेच्या स्थायी समितीने काही सुधारणा केल्यानंतर विधेयकाला मंजुरी मिळाली.

त्यानंतर प्रत्येक राज्याने आपल्या अखत्यारितील महापालिकांना त्यांचे धोरण आखण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.त्यानुसार या धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली असून कोपरगाव शहरातील कोपरगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न लक्षात घेऊन,तसेच रहदारीला होणाऱ्या अडथळा कमी करण्याच्या उद्देशाने विक्री ना-विक्री प्रक्षेत्र ठरविणे,नगर पथ विक्रेता ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र वाटप,शुल्क व आकार,कल्याणकारी योजनांचा लाभ मिळून देणे आदी अनुषंगिक बाबीच्या नियोजना करिता सदर समितीची बैठक आयोजित केली आहे.
सदर बैठक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन सभागृह येथे शुक्रवार दि.०३ जून रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.सदर बैठकीस आपण नगर पथ विक्रेता समितीचे सदस्य म्हणून उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासक शांताराम गोसावी यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close