जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या नेत्याने आगामी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी देखील ५ क्रमांक साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी आणि शहराच्या विकासासाठी देखील १८ कोटी निधी दिला आहे.त्यामुळे विकासापासून दूर असलेलं कोपरगाव शहर विकासाच्या वाटेवर आले असून शहर वासीयांसानी याची आठवण ठेऊन आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमत देऊन निवडून द्यावे असे आवाहन करून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

ज्याप्रमाणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहर वासीयांनी विश्वास दाखवला त्याची परतफेड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावून व शहरातील रस्त्यांना व शहर विकासाला कोट्यावधी रुपयांचा निधी देवून केली आहे.कोपरगाव शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणायचा हि जबाबदारी आपली असून नगरपालिकेत एक हाती सत्ता द्यायची जबाबदारी तुमची आहे असे म्हणून पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

कोपरगाव येथील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरातील प्रभाग क्र.५ च्या सर्वे क्र. ८८८ (८८९) मध्ये ९.९९ लक्ष रुपये निधीतून बांधण्यात येणारा सभामंडप,प्रभाग क्र.१३ च्या सर्वे क्र.१९२९ मध्ये १० लक्ष रुपये निधीतून नवीन छत बांधणे व सुशोभीकरण करणे,प्रभाग क्र.१२ सर्वे क्र.१०५ मध्ये हनुमाननगर भागात १२.४२ लक्ष रुपये निधीतून कब्रस्तान दुरुस्ती व सुशोभीकरण करणे तसेच मोहिनीराजनगर भागातील ५५.६० लक्ष रुपये निधीतून अमरधाम विकसित करणे आदी विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,दिनार कुदळे,दिनकर खरे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार,जावेद शेख,राहुल देवळालीकर,बाळासाहेब रुईकर,अशोक आव्हाटे आदी उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”अडीच वर्षापूर्वी कोपरगाव शहराची अवस्था काय होती. शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.खराब रस्त्यांचा परिणाम शहरातील छोट्या मोठ्या व्यवसायांवर झाल्यामुळे व्यवसायिकांच्या चिंता वाढल्या होत्या.परंतु महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात मिळालेले यश आणि शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांसाठी निधी आणल्यामुळे आज शहराचा चेहरा नक्कीच बदलला असल्याचा दावा केला आहे.मात्र माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे नाव घेण्याचे टाळले आहे.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शहरातील अमरधामची देखील मोठी दुरावस्था झाली होती.अमरधामच्या दुरुस्तीसाठी देखील निधी दिला आहे त्यामुळे त्याठिकाणी सोयी सुविधा निर्माण होणार आहेत.विविध समाजाच्या सभामंडपासाठी देखील निधी दिल्यामुळे प्रत्येक समाजाला त्यांच्या हक्काची जागा मिळणार असून या सभामंडपात विविध कार्यक्रम घेण्यास त्या त्या समाजाची सोय होणार आहे.मात्र एवढ्यावरच थांबून चालणार नाही शहर विकासाचे अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्याचा देखील निपटारा होणे गरजेचे असून त्यासाठी नगरपालिकेची सत्ता देखील तेवढीच महत्वाची आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विश्वास दाखवला त्याची परतफेड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावून व शहरातील रस्त्यांना व शहर विकासाला कोट्यावधी रुपयांचा निधी देवून केली आहे.कोपरगाव शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणायचा हि जबाबदारी आपली असून नगरपालिकेत एक हाती सत्ता दयायची जबाबदारी तुमची आहे.अडीच वर्षात झालेला विकास पाहता ती जबाबदारी कोपरगाव शहरातील सुज्ञ नागरिक निश्चितपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close