कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील विकासकामे वेगाने पूर्ण करा-…या नेत्याच्या सूचना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मतदार संघाच्या विकासासाठी आणलेल्या निधीतून विकासकामे तातडीने पूर्ण झाली पाहिजे.ज्या कामांना विलंब होत आहे त्याबाबत सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून होत असलेला विलंब का होत आहे याचा शोध घेवून त्यातून मार्ग काढा व लवकरात लवकर विकासकामे पूर्ण करा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
“मतदार संघात अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.पावसाळा थोड्याच दिवसांवर येवून ठेपला असतांना रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या आत चांगल्या दर्जाची तातडीने पूर्ण करा.जून महिन्यापासून शाळा सुरु होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,साई बाबा संस्थान शिर्डी.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या विकास कामांचा ना. आशुतोष काळे यांनी गौतम बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत आढावा घेवून कामात उणीवा असलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान उपटले आहेत.
सदर आढावा बैठकीसाठी पंचायत समिती,कोपरगाव नगरपरिषद,एस.टी.महामंडळ,सार्वजनिक बांधकाम विभाग,समृद्धी महामार्ग,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ,मुख्यमंत्री ग्रामसडक आदीसह गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता लोखंडे,उपअभियंता चोळके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे,पंचायत समिती अभियंता उत्तम पवार,विस्तार अधिकारी डी.ओ. रानमाळ,कोपरगाव बस व्यवस्थापक अभिजित चौधरी,श्रीरामपूर बस आगार व्यवस्थापक राकेश शेवडे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम,कारभारी आगवन,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,माजी पंचायत समिती माजी उपसभापती अर्जुन काळे,सदस्य मधुकर टेके,अनिल कदम, श्रवण आसने,दिलीप दाणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की,”मतदार संघात अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.पावसाळा थोड्याच दिवसांवर येवून ठेपला असतांना रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या आत चांगल्या दर्जाची तातडीने पूर्ण करा.जून महिन्यापासून शाळा सुरु होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही याची काळजी घेवून ज्या दिवशी शाळा सुरु होईल त्या दिवसापासून प्रत्येक गावात बस सेवा सुरु होईल असे नियोजन करा.मतदार संघातील राहाता तालुक्यातील ११ गावांसाठी उपयुक्त असणारी बस सेवा पूर्ववत सुरु कराव्या.डाऊच खुर्द गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची जागा समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित करण्यात आली असून राज कन्स्ट्रक्शनकडून होत असणारे नवीन साठवण तलावाचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार डाऊच खुर्द ग्रामस्थांनी केली होती.
सदर तक्रारीची दखल घेऊन डाऊच ग्रामस्थांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी राज कन्स्ट्रक्शन, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व डाऊच ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेत सदर तलावाचे काम आराखड्यानुसार गुणवत्तेत व लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना दिल्या.