गुन्हे विषयक
बस-इनोव्हा अपघात,कोपरगावातील चार गंभीर जखमी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सिन्नर तालुक्यातील पाथरे ग्रामपंचायत हद्दीत शिर्डी-नाशिक महामार्गावर पाथरे फाट्याजवळ काल रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास राज्य परिवहन मंडळाची बस (क्रं.एम.एच.१४ बी.टी.०७०९) व कोपरगाव येथील इनोव्हा कार (क्रं.एम.एच.०२ ए.वाय.८१०९) यांच्यात जोराची धडक होऊन त्यात कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा व शहरातील चार जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
संकल्पित छायाचित्र
सिन्नर तालुक्यातील पाथरे ग्रामपंचायत हद्दीत पाथरे फाट्याजवळ शिर्डी-नाशिक महामार्गावर एक राज्य परिवहन मंडळाची बस व कोपरगाव येथील इनोव्हा कार यांच्यात रात्री ०८.३० जोराची धडक झाली. त्यात कोपरगाव नजीक जेऊर पाटोदा येथील रहिवासी व कोपरगाव पंचायतीचे माजी पदाधिकारी मच्छीन्द्र केकाण व त्यांचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक दशरथ पालवे यांचेसह चार जण जखमी झाले आहे.
या प्रकरणी वावी येथील रहिवासी व क्रेन चालक इक्बाल गुलाब अत्तार (वय-५१) रा.वावी ता.सिन्नर यांनी वावी येथील पोलीस ठाण्यास खबर दिली आहे.दरम्यान या प्रकरणी पोलिसानी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३०/२०२२ दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,सिन्नर तालुक्यातील वावी येथील रहिवासी असलेले खबर देणार इसम व क्रेन चालक इक्बाल अत्तार हे आपल्या दुकानात काम करत असताना त्यांना एक भ्रमणध्वनी आला त्यात खबर देणार याने कळवले की पाथरे ग्रामपंचायत हद्दीत पाथरे फाट्याजवळ शिर्डी-नाशिक महामार्गावर एक राज्य परिवहन मंडळाची बस व कोपरगाव येथील इनोव्हा कार यांच्यात रात्री ०८.३० जोराची धडक झाली आहे. त्यात कोपरगाव नजीक जेऊर पाटोदा येथील रहिवासी व कोपरगाव पंचायतीचे माजी पदाधिकारी मच्छीन्द्र केकाण व त्यांचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे सोनारी येथील नातेवाईक दशरथ पालवे,संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी दत्तात्रय सांगळे यांचेसह चार जणांचा समावेश आहे.हे सिन्नर येथील एका नियोजित ठिकाणी जात असताना त्यांच्या टोयोटा इनोव्हा कारला समोरून येणाऱ्या बसने जोराची धडक दिली आहे.त्यांना नजीकच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दोघांना उपचारार्थ दाखल केले आहे.तर काहींना कोपरगाव येथील डॉ.जपे हॉस्पिटल येथे खाजगी रुग्णालयात भरती केले आहे.त्याला वावी येथील पोलीस अधिकारीं व वैद्यकीय उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान उपचार करणाऱ्या दवाखान्यात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान या प्रकरणी वावी येथील क्रेन धारक व काही नागरिकांनीं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना त्वरित उपचारार्थ हलवले आहे.वावी पोलिसांनी या प्रकरणी या वाहनाविरुद्ध मोटार वाहन अपघात रजी.क्रं.३०/२०२२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कोते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जगताप हे करीत आहेत.