कोपरगाव तालुका
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा- या नेत्याच्या सूचना
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात प्रशासनावर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान आहे.१५ एप्रिल पर्यन्त देशात शहरे व गावे बंद करण्यात आले असून शासनाच्या वतीने सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे.त्या सूचनांचा आदर करून बंद काळात नियम पाळून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे-आ.काळे
२०१९ च्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या होता तोंडाशी आलेला घास निसर्गाने घेऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.त्यावेळी सोयाबीन, बाजरी,कापूस आदी काढणीस आलेल्या पिकांना कोंब फुटले होते तर काही पिकांना नाईलाजाने सोडून देण्याची परिस्थिती उद्भवली होती.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात व मुबलक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू,हरबरा,कांदे,ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी करण्यात आली होती.गहू हरबरा पिकांना जरी पूर्णपणे पोषक वातावरण मिळाले नसले तरी सर्व पिके जोमात होती.मागील काही महिन्यांपासून जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने देशात कहर उडवून महाराष्ट्रात देखील त्याचा फटका बसला आहे. एकीकडे जागतिक साथीचे संकट तर दुसरीकडे अस्मानी संकट अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहे.