जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वाबळेंची निवड कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा – आ.आशुतोष काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

आपल्या कोपरगावच्या अनेक भूमिपुत्रांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कोपरगावचे नाव उंचावले आहे. कोपरगावचे भूमिपुत्र असलेले गणेशकुमार वाबळे यांची इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरिअर अँड डिझाईनर रिझनल चॅप्टर पुणे या संस्थेच्या अध्यक्षपदी झालेली निवडीने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगावचे भूमिपुत्र गणेशकुमार वाबळे यांची इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरिअर अँड डिझाईनर रिझनल चॅप्टर पुणे या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. कोपरगाव आर्किटेक्ट अँड इंजिनिअरींग असोसिएशन यांच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते गणेशकुमार वाबळे यांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव देशमुख होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, आपला व्यवसाय सांभाळून, आपले कर्तव्य पार पाडून, आपले आई-वडील, कुटुंब यांना कधीही दुर्लक्षित न करता एवढे यश संपादन करणे गौरवास्पद आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रीय राहून समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकीची आजच्या तरुणाईने प्रेरणा घेतली पाहिजे. आजच्या कलीयुगात आई वडिलांची करीत असलेली त्यांची सेवा श्रावण बाळापेक्षा नक्कीच कमी नाही याचा मला एक कोपरगावचा नागरिक म्हणून अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

यावेळी प्रसाद नाईक, अरुण काळवाघे, अॅड. सी. एम. वाबळे आदी मान्यवरांसह इंजिनिअर असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close