कोपरगाव तालुका
शास्त्रोक्त माहिती घेवून आपत्कालीन प्रसंगी सहकार्य करा-आवाहन
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी) आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जातांना शास्त्रोक्त माहिती घेवून आपत्कालीन प्रसंगी सहकार्य करा असे आवाहन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे निरीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी कोपरगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
या प्रसंगी पूर,वीज,आग,भूकंप नैसर्गिक आपत्ती प्रसंगी प्राथमिक स्तरावर उपाययोजना संदर्भात माहिती सांगून सामुग्री हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनाही प्रात्यक्षिक प्रशिक्षणात सहभागी करण्यात आले.तसेच डॉ. फुलसौदर यांनी कोरोना विषाणू संदर्भात उपाययोजना आणि आवश्यक काळजी बाबत समुपदेशन केले.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन शाखा वतीने कोपरगाव तहसिल कार्यालय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल,धुळे यांचे वतीने श्री. स.ग.म.महाविद्यालयातील एन.सी.सी. आणि एन.एस.एस.चे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा तसेच कोरोणा विषाणू संदर्भात खबरदारी व उपाययोजना समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते. सदर प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख डॉ.विरेंद्र बडदे,उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार योगेश चंद्रे, प्राचार्य डॉ.शंकर थोपटे,राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे निरीक्षक चंद्रकांत पारसकर,सहाय्यक बळीराम गायकवाड,भगवान खंडारे,विशाल पाटील यांचेसह २४ लोकांचे पथक,वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे,प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ.गायत्री कांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पूर,वीज,आग,भूकंप नैसर्गिक आपत्ती प्रसंगी प्राथमिक स्तरावर उपाययोजना संदर्भात माहिती सांगून सामुग्री हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनाही प्रात्यक्षिक प्रशिक्षणात सहभागी करण्यात आले.तसेच डॉ. फुलसौदर यांनी कोरोना विषाणू संदर्भात उपाययोजना आणि आवश्यक काळजी बाबत समुपदेशन केले.नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगांव प्रकाशित कोरोना जनजागृती पत्रकाचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक एन.सी.सी.अधिकारी डॉ.चंद्रभान चौधरी यांनी केले तर सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी तर आभार तुरुंग अधिकारी रविंद्र देशमुख यांनी मानले.कार्यशाळेचे यशस्वीतेसाठी एन.सी.सी.च्या अधिकारी शोभा दिघे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.बाळासाहेब वाघमोडे,प्रा.कैलास महाले,पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संजय वाबळे,अमित खोकले,मुकुल आहेर,पिंटू आहेर,विजय मरसाळे,दिपक थोरात,सुरेश बत्रा, यांचे सह पोलीस पाटील, आपत्कालीन सेवा पथक,एन.सी.सी.आणि एन.एस.एस.चे विद्यार्थी उपस्थित होते.