जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करून द्या-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग १६० या शिर्डी-सिन्नर रस्त्याचे काम वर्तमानात वेगाने सुरु असून त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या प्रकल्पबाधित नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई द्यावी तसेच शेती महामंडळाच्या शेतजमिनी ज्या खंडकरी शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत त्या खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून त्यांच्या नावावर करून देण्याचे आदेश आ.आशुतोष काळें यांनी नुकतेच दिले आहे.

समृद्धी महामार्गासाठी जे रोहित्र स्थलांतरित केलेले आहे त्या रोहीत्रांपासून जाणाऱ्या वीज वाहिन्या काही ठिकाणी जमिनीपासून हाताच्या अंतरावर आल्या आहेत त्यामुळे दुर्घटना घडू शकतात. महावितरणने या वीज वाहिन्या दुरुस्त कराव्यात, समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्या जमिनीतून मातीचे उत्खनन करीत असतांना इतर शेतकऱ्यांचे सिंचनासाठी करण्यात आलेल्या जलवाहिणीचे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून या शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे-आ. काळे

कोपरगाव तालुक्यात मुंबई नागपूर महामार्गाचे काम उशिराने चालू असून त्यात अनेक शेतकाऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींकडे केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या समवेत शेतकरी व नागरिक यांची तहसील कार्यालयात बैठक घेतली या वेळी बोलत होते.

सदर प्रसंगी सभापती पौर्णिमा जगधने, समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा व इतर अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, रोहिदास होन, सुधाकर होन, विलास चव्हाण, राहुल जगधने तसेच बाधित नागरिक उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, या कामांसाठी ज्या रस्त्यांचा उपयोग केला जात आहे ते रस्ते खराब झाल्यास त्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. समृद्धी महामार्गासाठी जे रोहित्र स्थलांतरित केलेले आहे त्या रोहीत्रांपासून जाणाऱ्या वीज वाहिन्या काही ठिकाणी जमिनीपासून हाताच्या अंतरावर आल्या आहेत त्यामुळे दुर्घटना घडू शकतात. महावितरणने या वीज वाहिन्या दुरुस्त कराव्यात, समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्या जमिनीतून मातीचे उत्खनन करीत असतांना इतर शेतकऱ्यांचे सिंचनासाठी करण्यात आलेल्या जलवाहिणीचे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून या शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे व या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी. तसेच जमिनीतून मातीचे उत्खनन करीत असतांना अनेक ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात येत असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे विहिर, बोअर आदी पाण्याचे स्त्रोत आटल्याच्या तक्रारी आल्या असून या शेतकऱ्यांना नियमानुसार मदत द्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र व ज्या नागरिकांचे घरकुल बाधित झाले आहे त्या नागरिकांना बाजार मुल्यानुसार जास्तीत जास्त मदत द्यावी. तसेच खंडकरी शेतकऱ्यांना शेती महामंडळाच्या जमिनी देण्यात आल्या आहेत.अनेक दिवसापासून या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात अडचणी येत असल्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात आलेल्या नाहीत. या शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून जमीनी मिळाव्या अशी मागणी असून या जमिनी लवकरात लवकर मोजून त्या शेतकऱ्यांच्या नावावर करून देण्याच्या सूचना आ.काळे यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close