जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील कामे ठप्प,राष्ट्रवादीचे आंदोलन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शराहत प्रलंबीत कामांची संख्या वाढली आहे परिणामस्वरूप नागरीकांना त्रास सहन करावा लागत असून हि थांबलेली विकासकामे त्वरित सुरु करावी विकासकामे थांबविणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा देत कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना घेरावो आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे.

कोपरगाव शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी व कोपरगाव शहरातील जनतेचे होत असलेले हाल थांबविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.काळे यांनी विशेष प्रयत्न करून त्यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या मिळविलेल्या निधीतून तसेच विविध खात्यांकडून शहरविकासासाठी मिळालेल्या निधीतून मे सुरु झालेली विकास नाही त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,रमेश गवळी,फकीर कुरेशी,दिनकर खरे,जावेद शेख,राहुल देवळालीकर,इम्तियाज अत्तार,राजेंद्र खैरनार,बाळासाहेब रुईकर,वाल्मिक लहिरे,धनंजय कहार,संदीप कपिले,राजेंद्र आभाळे,संतोष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”ना.काळे यांनी दिलेल्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव शहरात श्री छत्रपती संभाजी सर्कल ते गोकुळ नगरी रस्ता,बाजारतळ स्मशानभूमी,मोहनीराज नगर,धारणगाव रोड,श्री छत्रपती संभाजी सर्कल तेआचारी हॉस्पिटल,श्री छत्रपती संभाजी सर्कल ते नागरे पेट्रोल पंप,नगरपालिका प्रशासकीय इमारत समोरील गार्डन,तसेच प्रत्येक प्रभागात सुरु असलेल्या छोट्या मोठ्या रस्त्यांसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकासकामे सुरु होवून शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र काही महिन्यापासून हि विकासकामे थांबली आहेत तर काही विकासकामे अतिशय संथ गतीने सुरु असल्यामुळे शहरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दोन महिन्यावर पावसाळा येवून ठेपला आहे.त्याच्या आत सर्व विकासकामे पूर्ण व्हावीत अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र हि विकासकामे तातडीने पुर्ण करण्यात सुरु असलेल्या दिरंगाईमुळे या विकासकामात राजकारण तर आडवे येत नाही ना ? असा जाब राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना विचारला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेवर मुदतीच्या आत पूर्ण करून घेणे हि जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची आहे.त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दाखल घेवून व आपली जबाबदारी ओळखून कोपरगाव नगरपरीषद प्रशासनाने थांबलेली विकासकामे तातडीने सुरु करावी.हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close