कोपरगाव तालुका
प्रा.सरला तुपे यांना पी.एच.डी. प्रदान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरानगर ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात पदव्युत्तर हिंदी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका सरला सुर्यभान तुपे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्या वाचस्पती (पी.एच.डी.) पदवीने गौरविण्यात आले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रा.सरला तुपे यांनी ‘धीरेंद्र अस्थाना के कथा साहित्य में स्त्री विमर्श’ या विषयावर शोध निबंध सादर केला होता.त्यांना कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैय्या महाविद्यालय कोपरगावचे हिंदी संशोधन केंद्र समन्वयक डॉ.जिभाऊ मोरे व बिटको महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.अशोक धुलघुले यांचेही मार्गदर्शन लाभले होते.
प्रा.सरला तुपे यांनी आजवर राष्ट्रीय,अंतरराष्ट्रीय स्तरावरती सोळापेक्षा अधिक शोधनिबंध सादर केले आहेत.त्यांच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीणचे अध्यक्ष माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे,शालीनी विखे, खा.डॉ.सुजय विखे,संस्थेचे प्राचार्य,प्राध्यापक आदींनी अभिनंदन केले आहे.