कोपरगाव तालुका
सुरेगावात एकास मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सुरेगावात ग्रामपंचायत हद्दीत बागुल वस्ती कोपरगाव येथील रहिवाशी फिर्यादी इसम प्रसाद चांगदेव कोहिले (वय-३२) यांना नुकतीच आरोपी शिवशंकर रामचंद्र ढोबळे यांनी मागील पाच वर्षांपूर्वीच्या भांडणाचा राग धरून आंबिकानगर सुरेगाव येथील आरोपी शिवशंकर रामचंद्र ढोबळे,गणेश रामचंद्र ढोबळे,रामचंद्र ढोबळे,सुमन रामचंद्र ढोबळे व वेळापूर येथील पाचोरे नावाचा इसम (पूर्ण नाव उपलब्ध नाही) शिवशंकर ढोबळे यांच्या दुकानावर बसलेले अन्य दोन अनोळखी इसम आदी सात जणांनी शिवीगाळ करत डोक्यात,पाठीत लाथाबुक्यांनी व फावडे व फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान पाच वर्षांपूर्वी फिर्यादी प्रसाद कोहिले व अंबिकानगर सुरेगाव येथील आरोपी शिवशंकर रामचंद्र ढोबळे यांचे काही कारणावरून भांडण झाले होते.या भांडणाचा राग धरून वरील सात आरोपीनी फिर्यादी प्रसाद कोहिले यांना मारहाण केली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.१८/२०२०,भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ अन्वये सातही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भगवान ढाका हे करीत आहेत.