जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

..त्या कर्जाचा व्याजदर घटविण्याची कुचेष्टा बंद करा-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जाचा व्याजदर कमी करावा यासाठी “सदिच्छा मंडळाने” रान ऊठवल्यानंतर जिल्हाभरातुन बारा हजार सभासदांकडुन कर्जाचा व्याजदर कमी करण्याची मागणी जोर धरु लागताच, बँक संचालक मंडळ व गुरुमाऊली मंडळाने व्याजदर ठरवण्यासाठी अभ्यासगट नेमल्याची पोकळ घोषणा करुन सभासदांची चेष्टा सुरु केल्याचा आरोप सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी नुकताच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

यावेळी मुदत ठेव पावतीचा व्याजदर ७.२५ % केला,रिकरिंगचा व्याजदर ६.२५ % केला, याला अभ्यासगट लागला नाही मग कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी अभ्यासगट म्हणजे निव्वळ पोरकटपणा असुन ,विद्यमान संचालक मंडळ बँक चालवण्यासाठी सक्षम नसुन त्यांना अभ्यासगटाच्या”कुबड्यांची गरज पडते,त्या पेक्षा खुर्च्या खाली करुन निवडणुकीला सामोरे जा- शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे

मागील निवडणुकीत सत्तेत येतांना गुरुमाऊली मंडळाने सभासदांना दिलेल्या वचननाम्यात वचन क्रं-६ हे”महत्वाचे निर्णय आमसभेत घेऊ”असे जाहीर केले होते.कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी अभ्यासगट नेमला,मग घड्याळांची खरेदी करतांना आमसभा वा अभ्यासगट का नेमला नाही ? असा सवाल केला आहे.तसेच नेवासा शाखा फक्त दुरुस्तीत सुमारे २३ लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च दाखवली,कर्मचार्‍यांना रजा पगार देणे,कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग देत आयोगाचा मागील सर्व फरक एकाच वेळेस देत त्यावर हात मारणे,संचालक प्रवास भत्यात वीसपट वाढ,सुरक्षा रक्षकांच्या नावाखाली दरमहा हजारो रुपयांची लुट,कर्मचारी गणवेश खरेदी,कायम ठेव दरमहा हप्त्यात भरमसाठ वाढ करणे, या व इतर आर्थिक लाभाच्या अनेक गोष्टी करतांना “अभ्यास गट का नेमला नाही ? असा सवाल माळवे यांनी शेवटी केला आहे.

या प्रसिद्धि पत्रकावर सदिच्छा मंडळाचे गजानन ढवळे,बाळासाहेब साळुंके,गोकुळ कळमकर,बाळासाहेब खिलारी,राजु कुदनर,अशोक आवारी,पांडुरंग काळे,बाळकृष्ण कंठाळी,रामदास दहिफळे,सुरेश खेडकर,रामदास गव्हाणे,हरिश्चंद्र बडे ,गौतम साळवे आदींच्या सह्या आहेत.जुलै २०२० मध्ये शेवटच्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळ बैठकीत व्याजदर कमी करण्याचा ठराव पास होईल ही भाबडी आशा सभासदांनी बाळगली होती,पण संचालक मंडळाने त्यास केराची टोपली दाखवली.निवडणुक दोन-तीन महिने राहिल्यावर थोडा व्याजदर कमी करुन सभासदांची चेष्टा करतील अशी कोपरखेळी सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र पिंपळे यांनी मारली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close