कोपरगाव तालुका
मतदार संघाचा विकास साधण्यासाठी रस्ते विकास करणे अत्यंत गरजेचे-प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रस्त्यांशिवाय विकास शक्य नाही.मतदार संघाचा विकास साधण्यासाठी रस्ते विकास करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी नुकतेच माहेगाव देशमुख येथे एका कार्यक्रमांत बोलताना म्हटले आहे.
माहेगाव देशमुख व कोळपेवाडी येथील चाऱ्यांच्या लगत रस्त्यांना ३० लाख रुपयांचा निधी दिला आहे.या निधीतून माहेगाव देशमुख येथे १० लक्ष रुपये निधीतून चारी नं.६ जाधव वस्ती ते पटेल वस्ती कोळपेवाडी येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या चारी नं.६ सुनील जाधव घर ते ग्रामा १०१ रस्ता व चारी नं. ५ कोळपेवाडी-माहेगाव देशमुख शिव ते ग्रामा १०१ रस्ता मजबुतीकरण करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच ना.काळे यांच्या हस्ते पार पडले त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सूर्यभान कोळपे,संभाजी काळे,सुंदरराव काळे,संजय काळे,शिवाजी काळे,मधुकर काळे,भास्करराव काळे,कचरू कोळपे,डॉ.प्रकाश कोळपे,प्रल्हाद काळे,सुनील जाधव,रविंद्र काळे,बाळासाहेब गुंड,सूर्यभान लांडगे,सतिश लांडगे,गणेश लांडगे,अमोल लांडगे,संजय जाधव,बापू वनसे,प्रमोद लांडगे,सुरेश लांडगे,लखन जाधव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाडे,ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.