जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिक्षण सर्वसमावेशक झाल्याशिवाय सामाजिक उत्कर्ष होऊ शकत नाही-प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)

माणसाच्या ज्ञानात सतत होत असलेल्या वाढीचा आणि बदलत्या जीवनाचा विचार करता शिक्षण सर्वसमावेशक झाले तरच समाजाच्या उत्कर्षासाठी ते उपयुक्त ठरु शकते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण पुणे विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी संवत्सर येथे आयोजित कार्यक्रमात केले आहे.

सदर प्रसंगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून फिरत्या वाचनालयाचा उपक्रम सुरु करण्यात आला असून त्यासाठी संवत्सर परिसरातील नऊ शाळांमधील शिक्षकांनी वर्गणीच्या स्वरुपात जमा केलेल्या १५ हजार रुपये रकमेचे वितरण श्री टेमकर यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

नगर जिल्हा परिषदेमध्ये सेवा केलेले दिनकर टेमकर यांची राज्याच्या शिक्षण संचालकपदी, रमाकांत काटमोरे यांची औरंगाबाद येथील प्राथमिक शिक्षण विभागात उप-संचालकपदी,रामदास हराळ यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागात शिक्षणाधिकारीपदी,पोपटराव काळे यांची पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात शिक्षणाधिकारीपदी,शिवाजीराव शिंदे यांची नाशिक येथील आदिवासी विकास विभागात सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे यांनी संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील शैक्षणिक सभागृहामध्ये सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सत्कारास उत्तर देताना टेमकर बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी जिल्हा अपरिषद सदस्य राजेश परजणे हे होते.

सदर कार्यक्रमास सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,केशवराव भाकरे,लक्ष्मणराव परजणे,खंडू फेपाळे,अनिल आचारी,अविनाश गायकवाड,चंद्रकांत लोखंडे,काका गायकवाड, आण्णासाहेब तिरमखे,बाळासाहेब दहे,सुभाष डरांगे,राजेंद्र ढेपले,कृषी अधिकारी बाळासाहेब साबळे,ग्रामविकास अधिकारी कृष्णाकांत आहिरे,डॉ.अनिकेत खोत,बापू तिरमखे,अमोल परजणे, नामदेव शिंदे यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”नगर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असताना अतिशय चांगले,दिशादर्शक काम मला करता आले.आपण राबविलेल्या काही उपक्रमांचा राज्य पातळीवर अवलंब केला गेला याचा अभिमान असल्याचे सांगून श्री टेमकर पुढे म्हणाले,शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगांव तालुक्यात आणि त्यात संवत्सर शाळेची झालेली शैक्षणिक प्रगती केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला दिशादर्शक ठरेल.नाविण्याचा ध्यास घेण्याची वृत्ती असली की,प्रगतीला अधिक वेग येतो हे संवत्सर येथे आल्यावर लक्षात येते.राज्यात शिक्षण क्षेत्रातल्या रिक्त पदांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे.सरळसेवा भरतीने ५० टक्के तर पदोन्नतीने ५० टक्के पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाकडे आपण पाठविलेला आहे.त्यामुळे रिक्त पदांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असेही ते शेवटी म्हणाले.

सदर प्रसंगी राजेश परजणे म्हणाले की,”चारित्र्य संपन्न व्यक्ती घडविणे हे शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे.सुरुवातीपासूनच विद्यार्थ्याना चांगल्या जीवनमूल्यांची ओळख झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात त्या मूल्यांबाबत आस्था निर्माण झाली पाहिजे.त्यांचे नैतिक वर्तन सर्वसामान्य अशा सामाजिक मूल्यांशी सुसंगत असायला हवे हाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन कोपरगांव तालुक्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्याथ्यांमध्ये शिक्षणाविषयी सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. शासकीय सेवेतील सर्वच नोकरदारांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेण्यास आग्रहीत करावे आणि हा प्रयोग संपूर्ण राज्यभर राबविला जावा अशी मागणी श्री परजणे यांनी यावेळी केली.
प्रारंभी प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रास्ताविक केले.
तर माजी केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले यांनी स्वागत केले आहे तर रमाकांत काटमोरे,पोपटराव काळे,रामदास हराळ,शिवाजी शिंदे,राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,कोपरगांवचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून फिरत्या वाचनालयाचा उपक्रम सुरु करण्यात आला असून त्यासाठी संवत्सर परिसरातील नऊ शाळांमधील शिक्षकांनी वर्गणीच्या स्वरुपात जमा केलेल्या १५ हजार रुपये रकमेचे वितरण श्री टेमकर यांच्याहस्ते करण्यात आले.

सूत्रसंचलन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक फय्याज पठाण यांनी केले तर कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close