कोपरगाव तालुका
गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या जमिनी प्रस्थापितांकडून काढुन तरुणांसाठी औद्योगिक वसाहत स्थापा-जाधव
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव येथील महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या जमिनी या प्रस्थापितांकडून काढुन घेऊन त्या जागी तरुणांसाठी औद्योगिक वसाहत आणावी असे आवाहन शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी सरकारला कोपरगाव येथे बोलताना केले आहे.
“कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली “काँग्रेस भवनची”जमीन स्वतःच्या नावावर केली तर तर त्यावर विश्वस्त म्हणून स्वतःची बायको,बाप आणि स्वतःचे नाव लावून घेतले आहे.यशवंत कुक्कुट पालन संस्थेची जमीन हडप केली यावर आता आवाज उठवला पाहिजे”-अड.दिलीप लासुरे,सदस्य,कोपरगाव वकील संघ.
कोपरगाव तालुक्यातील महात्मा गांधी ट्रस्टच्या अवैधरित्या ताब्यात अनेक दशके अवैधरित्या ताब्यात ठेवलेल्या कोपरगाव शहराच्या उत्तरेस असलेल्या साईबाबा चौकाच्या आजूबाजूस असलेल्या सि.स.क्रं.१९३५ मधील ५० एकर ३३ आर.हे क्षेत्र सरकारने आपल्या ताब्यात घेण्याचा आदेश नुकताच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाने दिला असला तरी या बाबत महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टने या बाबत नाशिक येथील आयुक्तांकडे तर शेतकरी सहकारी संघ यांनी कोपरगाव येथील दिवाणी न्यायाधीश यांच्यासमोर अपील केले असून या सुवनावणीस कोणत्या ना क्लुप्त्या काढून टाळाटाळ सुरु असल्याच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जनजागृती सभेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव,नेते प्रवीण शिंदे,अड.दिलीप लासुरे,नवनाथ औताडे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,तुमचे इतके कर्तृत्व आहे तर तुम्हाला निवडून यायला शिवसेना भाजपचा आधार का घ्यावा लागला मग तुम्ही नेमके काय दिवे लावले आहे.आधी तुमच्या लाडक्या दिव्यांना ग्रामपंचायतीत उभे करून दाखवा मग बाकी पदांच्या खिरापती वाटा असे आवाहन केले.शहरातील व तालुक्यातील सत्ता यांच्या ताब्यात पंचेचाळीस वर्ष असताना तालुक्यातील रस्ते का होत नाही ? असा खडा सवाल केला आहे.त्यावेळी त्यांनी वर्तमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचा गौरव केला व केंद्रीय सरकारची ईडी कोपरगाव येथील नेत्यांवर का धाड पडत नाही.येथील नेते ५६ एकर जमीन हडप करतात यांच्यावर धाडी टाकायच्या सोडून सेनेचे जाधव यांच्यावर ईडी धाडी टाकत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.कोपरगाव तालुक्यातील नेत्यांनी खरे तर कोरोना काळात शहरातील नागरिकांच्या घरपट्या व पाणी पट्या माफ करायला हव्या अशी मागणी केली आहे.
“कोपरगाव तालुक्यातील हजारो घरे गरिबांना का दिले नाही तुमच्या खिशातून काय जाणार होते ? तुम्ही ०४ हजार गरीब नागरिकांना व ग्रामस्थांना वंचित ठेवले आहे.केंद्र सरकार त्या साठी निधी देणार हॊते”-बाळासाहेब जाधव,माजी उपजिल्हाप्रमुख,शिवसेना.
कोपरगाव येथील महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या जमिनी या प्रस्थापितांकडून काढुन घेऊन त्या जागी तरुणांसाठी औद्योगिक वसाहत आणावी असे आवाहन सरकारला केले आहे.तालुक्यातील काळे-कोल्हे हे एकच असून त्यांच्या नौटंकीला भाळू नका ते जनतेला वेड्यात काढण्यासाठी तो विरोधाभास दाखवतात.ते सत्तेची पोळी वाटून खातात हे जनतेला माहिती झाले आहे.प्रदर्शन ट्रस्टच्या जमिनीचा ताबा सरकारला मिळावा म्हणून आपण खंडपीठात पाच वर्ष लढा दिला त्याला उच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला.सरकारी जमीन लाटायची यांना काय गरज आहे.साईबाबांच्या पेटीतील पैसा मते विकत घेण्यासाठी केला जातो.आता हे थांबायला हवे.न्यायालयाने निकाल देऊनही यांची नियत साफ नाही.दारूचा साखरेचा प्रचंड पैसा मिळत असताना सरकारी जमीन लाटायचा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.धोंडेवाडी येथील नागरिकांना न्याय का मिळाला नाही.त्यांचे घरे दोन दिवसात पाडले मग येथील या धेंडाना वेगळा न्याय का? शेतकऱ्यांचे नुकसान होणार असा दावा करतात पण त्यांनी एखाद्या शेतकऱ्यांचे कल्याण केले असे एक तरी उदाहरण दाखवा असे आव्हान दिले त्यावर त्यांच्या वकिलाची बोलती बंद केल्याची आठवण करून दिली आहे.
नगर जिल्हाधिकाऱ्यांनी साईबाबा कॉर्नर वरील अतिक्रमण काढण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश दाखवला त्यांनी आमची जमीन आहे असे आश्चर्यकारक उदगार काढले व लगेच काढतो असे सांगितले.पण कोपरगाव ला आल्यावर पण त्यांनी आश्चर्यकारकरित्या भूमिका बदलवली व त्यांना दोनदा कोरोना झाल्याचे सांगितले.सामान्य माणसाने जर अतिक्रमण केले तर त्याला वेगळा न्याय आणि प्रस्थापिताना वेगळा न्याय कसा? यातून जर कोणी कायदा हातात घेतला तर मग त्याला अडविण्याचा अधिकार कोणालाही राहणार नाही.
सदर प्रसंगी काही मागासवर्गीय नागरिकांनी सदर जमिनी आमच्या पूर्वजांच्या महार वतनाच्या असल्याचा दावा केला व त्या त्यांना परत मिळाव्या असा दावा केला आहे.त्याचे फेरफार असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळू पाहत आहे.
दरम्यान गाळे धारकांना आमच्या बद्दल गैरसमज पसरू पाहत असून ती जागा सरकारी असल्याने त्याचे भाडे खाजगी कोणालाही देऊ नका असे आवाहन केले आहे.मंगल कार्यालयाचे भाडे देऊ नका असे आवाहन केले आहे.
“महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या जमिनीत शेतकऱ्यांचे प्रदर्शन भरविण्याऐवजी मंगल कार्यालय बांधून,गाळे बांधून पैसा लुटण्याचे काम केले जात आहे.साईबाबा कॉर्नरवरील साईच्या दान पेटीतील पैसा कोठे जातो”-अड.दिलीप लासुरे,सदस्य,कोपरगाव वकील संघ.
सदर प्रसंगी कोपरगाव वकील संघाचे जेष्ठ सदस्य अड.दिलीप लासुरे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यात चुकीचे कामे तालुक्यात करणाऱ्या स्थान देऊ नका प्रस्थापितांनी तालुक्याची वाट लावली आहे.महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टची ५६ एकर जमीन स्वतःच्या ताब्यात घेतली असून ही सरकारी जमीन हडप केली आहे.अशीच बाब यशवंत सहकारी कुक्कुट पालन संस्थेची जमीन हडपली आहे.तर कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली “काँग्रेस भवन”जमीन स्वतःच्या नावावर केली तर तर त्यावर विश्वस्त म्हणून स्वतःची बायको,बाप आणि स्वतःचे नाव लावून घेतले आहे.यावर आता आवाज उठवला पाहिजे.त्यामुळे आगामी काळात यावर आवाज उठवावा लागेल.सहकारी साखर कारखान्यातील कामगारांची संघटनेच्या व स्व.किशोर पवारांच्या माध्यमातून कपात करून पाच कोटींचा निधी गायब केल्याचा गंभीर आरोप ऍड.दिलीप लासुरे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”आ.आशुतोष काळे यांची आता साई संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली पण साई बाबांच्या झोळीत हात घालू नका असे आवाहन केले आहे.महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या जमिनीत शेतकऱ्यांचे प्रदर्शन भरविण्याऐवजी मंगल कार्यालय बांधून,गाळे बांधून पैसा लुटण्याचे काम केले आहे.साईबाबा कॉर्नरवरील साईच्या दान पेटीतील पैसा कोठे जातो.असा जाहीर सवाल केला आहे.आगामी निवडणुकीत या दोघांना जनता निवडून देणार नाही आता तिसराच उमेदवार निवडून देणार आहे.त्यावेळी तालुक्यातील दोन्ही युवराजांचा जिल्हा बँकेच्या संचालक पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार वकील संघाने एकावेळी दोघांचा आयोजित केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.व यांचे नेमके कोणते कर्तृत्व आहे असा सवाल केला आहे.व तुमच्यातील एकही कार्यकर्ता जिल्हा बँकेच्या पदावर जाण्यास लायक नाही का? तुमच्या बायकांचे कोणते कर्तृत्व कमावले ? असा तिरका सवाल केला आहे.
सदर प्रसंगी सेनेचे तालुका संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे यांनी कोपरगावात शेतकऱ्यांच्या श्रमातून उभे राहीलेल्या साखर कारखान्याचे नाव बदलण्यात आले असून आता शासकीय इमारतीचे नाव बदलण्याचे षडयंत्र आखले असून कोपरगाव पंचायत समितीचा पहिला बळी ठरला असून आगामी काळात अन्य शासकीय या खाजगीकरनाचे बळी ठरण्याचा धोका वाढला असून तालुक्यातील नागरिकांनी सावध होण्याची गरज प्रतिपादन केली आहे.
सदर प्रसंगी प्रवीण शिंदे,नवनाथ औताडे,अड.दिलीप लासुरे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचलन नवनाथ औताडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रवीण शिंदे यांनी मानले आहे.