कोपरगाव तालुका
पेट्रोल पंप मिळवून देतो म्हणून ५.६ लाखांची फसवणूक,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील रहिवासी राधु पुंडलिक उकीर्डे यांना तुम्हाला पेट्रोल पंपाचे काम करून देतो म्हणून गणेशनगर,कल्याण येथील आरोपी संतोष तुकाराम वाघ याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ५ लाख ०६ हजार ३५७ रुपयांना डल्ला भरल्याची धक्कादायक घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील सावळगाव येथील रहिवासी राधु पुंडलिक उकीर्डे (वय-५२) हे त्यांना पेट्रोल पंप टाकावयाचा असल्याची माहिती फिर्यादीचे कोटमगाव येथील नातेवाईक वेणूनाथ कोटमे यांनी गणेशनगर फ्लॅट क्रमांक ५ तिसरा मजला कल्याण ता.कल्याण जिल्हा ठाणे येथील आरोपी एजंट संतोष तुकाराम वाघ यास करून दिली त्यातून उकीर्डे कुटुंबियांची व आरोपी संतोष वाघ यांची ओळख झाली. आरोपीने फिर्यादी राधु उकीर्डे यांचा विश्वास संपादन केला त्यातून हि फसवणूक घडली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील सावळगाव येथील रहिवासी राधु पुंडलिक उकीर्डे (वय-५२) हे त्यांना पेट्रोल पंप टाकावयाचा असल्याची माहिती फिर्यादीचे कोटमगाव येथील नातेवाईक वेणूनाथ कोटमे यांनी गणेशनगर फ्लॅट क्रमांक ५ तिसरा मजला कल्याण ता.कल्याण जिल्हा ठाणे येथील आरोपी एजंट संतोष तुकाराम वाघ यास करून दिली त्यातून उकीर्डे कुटुंबियांची व आरोपी संतोष वाघ यांची ओळख झाली. आरोपीने फिर्यादी राधु उकीर्डे यांचा विश्वास संपादन केला.व त्यातूनच १ सप्टेंबर २०१८ ते २६ जुलै २०१९ दरम्यान पाच लाख ०६ हजार ३५७ रुपयांची रक्कम देण्याचे ठरले.व उकीर्डे यांनी हि रक्कम संतोष वाघ यांच्या हवाली केली.मात्र या पेट्रोल पंपास मंजुरी का मिळेना हे लागोपाठ पाठपुरावा करूनही त्यांना समजेना. नंतर आरोपी हा त्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला व त्यांच्या लक्षात आले कि आपली फसवणूक झाली आहे.त्या नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपी संतोष वाघ याचे विरुद्ध भा.द.वि.कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सी.एस.पवार हे करीत आहेत.यापूर्वी कोपरगावात एम.आर.एफ. कंपनीची डिलर शीप देतो म्हणून १९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झालेली आहे.