कोपरगाव तालुका
काँग्रेसच्या…या बड्या नेत्यांचा कोपरगाव दौरा,काँग्रेस कार्यकर्त्याना उत्सुकता
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद,कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका आगामी काळात संपन्न होत असून पिछाडीला गेलेल्या काँग्रेसला सावरण्यासाठी व डिजिटल सभासद नोंदणी कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पातळीवरील नेते व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात केंद्रिय काँग्रेसचे सचिव एस.ए.संपतकुमार,प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे,राष्ट्रिय समन्वयक राहुल साळवे,राज्य डिजिटल नोंदणी प्रभारी विशाल मुत्तेमवार आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुक्यात नगर-मनमाड रोड लगत जेऊर कुंभारी येथील साई सृष्टी रिसॉर्ट येथे सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता हि बैठक संपन्न होत असल्याची माहिती कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी दिली असून या कडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
“डिजीटल सभासद नोंदणी व संघटनात्मक निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाने माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांची नेमणुक प्रदेश निवडणुक अधिकारी म्हणून केली आहे.पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्य नोंदणीकृत व बुथमध्ये नोंदणीकृतची नेमणूक करण्याचे ठरले आहे.त्यासाठी हा दौरा होत आहे”-नितीन शिंदे,तालुकाध्यक्ष,कोपरगाव तालुका काँग्रेस.
सदरचे सविस्तर्व वृत्त असे की,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण देशात काँग्रेस पक्षातर्फे सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.डिजीटल मेंबरशिपद्वारे जनतेमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सांगून त्यांना पक्षाचे क्रियाशिल सभासद करणाचे धोरण आखले आहे.या डिजीटल सभासद नोंदणी व संघटनात्मक निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाने माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांची नेमणुक प्रदेश निवडणुक अधिकारी म्हणून केली आहे.पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्य नोंदणीकृत व बुथमध्ये नोंदणीकृतची नेमणूक करण्याचे ठरले आहे.पक्षातील सर्व प्रमुख नेते मंडळी,पदाधिकरी,नगरसेवक यांनी हे डिजिटल सभासद नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.या पार्श्वभूमीवर त्यांचा नगर जिल्हा दौरा होत आहे.या दौऱ्यात माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात केंद्रिय काँग्रेसचे सचिव एस.ए.संपतकुमार,प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे,राष्ट्रिय समन्वयक राहुल साळवे,राज्य डिजिटल नोंदणी प्रभारी विशाल मुत्तेमवार आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुक्यात नगर-मनमाड रोड लगत जेऊर कुंभारी येथील साई सृष्टी रिसॉर्ट येथे सकाळी १०.३० वाजता हि बैठक संपन्न होत असून या कडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
या मेळाव्यास कोपरगाव,राहाता तालुक्यातील काँग्रेस प्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी शेवटी केले आहे.