गुन्हे विषयक
‘त्या’ चोरट्यांना तालुका पोलिसांनी केले मुद्देमालासह अटक,पोलिसांचे कौतुक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले छायाचित्रकार विजय सुनील गोल्हार यांचे ‘हिंदवी फोटोग्राफी’ या दुकानांचा मागील दरवाजा तोडून आतील सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केलेल्या कारवाईत दहिगाव बोलका (शिवाजीनगर)येथील दोन चोरटे जेरबंद केले आहे.त्यामुळे तालुका पोलीस अधिकारी आणि पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांना चोरट्यांची गुप्त खबर मिळाली होती.त्यानुसार त्यांनी केलेल्या कारवाईत रणजित धरम सिंग मुळेकर (वय-२४) यासह संतोष शामलाल यादव (वय-४०) रा.दहिगाव बोलका (शिवाजीनगर) अशा दोघांना जेरबंद केले असून त्यांना कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.सौ.बन्सोड यांचे समोर हजर केले असतां त्यांना न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात धूनमधूनच भुरटे चोरटे आपले डोके वर काढत असून त्यांचा उपद्रव तालुका पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.अशीच घटना नुकतीच पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली असून त्या ठिकाणी फिर्यादी विजय गोल्हार यांचे ‘हिंदवी फोटोग्राफी’ नावाचे छायाचित्रकारीचे दुकान आहे.त्यांच्या दुकानावर पाळत घेऊन अज्ञातच चोरट्यांनी दुकानांच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून दि.७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आतील ३० हजार रुपये किमतीचा संगणक,त्यास एच.पी.कंपनीचा २४ इंची स्क्रीन असलेला सी.पी.यू. त्यास ८ जी.बी.रँप, दोन हार्ड डीक्स ग्राफिक्स कार्ड्स,असलेला जुना वापरता.तर २० हजार रुपये किमतीचा एफसोन कंपनीचा प्रिंटर असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.त्यामुळे पढेगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४४३/२०२२ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.पुढील प्रभारी पोलीस निरीक्षक आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सी.बी.काळे हे करीत असताना त्यांना या चोरट्यांची गुप्त खबर मिळाली होती.त्यानुसार त्यांनी केलेल्या कारवाईत रणजित धरम सिंग मुळेकर (वय-२४) यासह संतोष शामलाल यादव (वय-४०) रा.दहिगाव बोलका (शिवाजीनगर) अशा दोघांना जेरबंद केले असून त्यांना कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.सौ.बन्सोड यांचे समोर हजर केले असतां त्यांना न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,सहाय्यक फौजदार सुरेश गागरे,पो.हे.कॉ.इरफान शेख,आबासाहेब वाखुरे,चालक रामचंद्र साळुंखे आदींनी मोलाची कामगिरी बजावली असून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.त्याबाबत तालुका पोलिसांचे पढेगाव परिसरसह तालुक्यात कौतुक होत आहे.