जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात महाविकास आघाडीच्या विरुद्ध आंदोलन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पार्टी-(वसंत स्मृती) च्या वतीने महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे.राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडी या संज्ञेखाली स्थापन झाले आहे.मात्र नागरिकांचे काहीच कामे होत नमसल्याचा आरोप विरोधी भाजपने केला असून त्या विरुद्ध आंदोलनाची हाक दिली होती. सावरकर चौक येथे धरणे देवून नंतर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात शिवसेनेने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देवून ७ / १२ कोरा झालाच पाहिजे . महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा करणेत करीता कठोर कायदा करण्यात यावा . थांबविलेली विकास कामे पून्हां तातडीने सुरू करण्यात यावी ,सरपंच ,नगराध्यक्ष, या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पूर्वीप्रमाणे नागरीका मधूनच व्हावयाला पाहिजे, हिंदू – मुस्लीमाबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या एम.आय.एम्.पक्षाचे माजी आमदार वारीस पठाण यावर तात्काळ कठोर कारवाई करावी,शेतकऱ्यांच्या अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची हेक्टरी २५ हजार मदत मिळालीच पाहिजे,शेतकऱ्यांना शेतीसाठी पूर्णदाबाने व दिवसाशेतीसाठी वीजपुरवठा कायमस्वरूपी करण्यात यावा तसेच गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याचे नुतनीकरण करण्यात यावे .आदी मागण्या सरकारपर्यंत तात्काळ पाठवून कार्यवाही करन्याची मागणी या वेळी करण्यात आली आहे.यावेळी भारतीय जनता पार्टीचे रामदास खैरे,सतिष कृष्णानी,प्रभाकर वाणी,प्रा.सुभाष शिंदे विनायक गायकवाड, चेतन खुबाणी,योगेश वाणी, किरण थोरात,सुरेश कांगुणे, राजेंद्र खैरे,चंद्रकांत कांबळे,रमेश नागरे,किरण ढोबळे, प्रकाश सवाई,वसंत जाधव,कैलास निकम,तसेच तालुक्यातील सुभाष दवांगे,नामदेव जाधव,माणिकराव लोहकणे, माधवराव सांगळे,बाळासाहेब वाघ,बापूसाहेब बरहाते, कैलास सिंगर,मंगेश सिंगर,अविनाश पानगव्हाणे आदी अनेक कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close