जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राज्य कृषी विभागाच्या स्पर्धामध्ये पुणे विभाग अव्वल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पुणे येथील राज्य सरकारचे कृषि आयुक्तालय व कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वार्षिक तीन दिवसीय कृषि राज्य स्तरिय तरंग कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथिल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आले होते.

यावेळी कृषीमंत्री भुसे म्हणाले की आत्मा मालिकने राज्य कर्मचाऱ्याच्या स्पर्धांसाठी दिलेले योगदान अनमोल आहे. यापूढे राज्य स्तरीय होणाऱ्या स्पर्धांसाठी लागणारा खर्च राज्याच्या कृषि विभागाकडून पूर्ण दिला जाईल असे म्हणत तात्पूत्या स्वरूपाची मदत म्हणून नामदार भुसे यांनी ५० हजार रूपये स्पर्धसाठी मदत केली.

या स्पर्धेमध्ये राज्याच्या ३४ जिल्ह्यातील ३ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये २९७ महिला खेळाडूंचा सहभाग होता वैयक्तिक व सांघिक अशा खेळांच्या प्रकारा बरोबर सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पुणे कृषि विभागाच्या कर्मचारी अधिकारी खेळाडूंनी १०० पैकी ८१ गुण मिळवून राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर ५५ गुण मिळवून सोलापूर कृषि विभागाने व्दीतीय ५४ गुण मिळवून अहमदनगर विभागाने तृतिय क्रमांक ४३ गुण मिळवून पालघर विभागाने चतूर्थ, ४१ गुण मिळवून अमरावतीने पाचवा, ३६ गुण मिळवून ठाणे विभागाने सहावा, तर ३५ गुण मिळवून रायगड विभागाने सातवा क्रमांक मिळवला आहे. विभाग निहाय यशवंत व गुणवंत खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी संपन्न झाला.

यावेळी जंगलीदास माऊलीं, परमानंद महाराज, निजानंद महाराज, विवेकानंद महाराज या प्रमुख मान्यवरांसह विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, वसंतराव आव्हाड, व्यवस्थापक हिरामन कोल्हे ,कृषि संचालक विजय घावटे, विभागीय कृषि सहसंचालक दिलीप झेंडे, श्रीरामपूरचे पोलीस उपअधिक्षक राहूल मदने, सदिंप खोते, रफिक नाईकवाडी,अहमदनगर जिल्हा कृषि अधिक्षक शिवाजी जगताप, नवनाथ कोळतकर, विलास नवगे, अशोक आढाव, मनोज सोनवणे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य सुधाकर मलिक, नितीन सोनवणे क्रीडा विभागाचे अशोक कांगणे, अजित पवार, शेसेंद्र त्रिपाटी, रविंद्र नेंद्रे, भुषण पाटिल, पद्मराज गायके, योगेश निळे, प्रदिप निपुंगे आदिंची उपस्थिती होती.

यावेळी दिलीप झेंडे म्हणाले कृषि विभागाचे कर्मचारी यांच्यामध्ये या क्रीडा स्पर्धामूळे खिलाडू वृत्ती निर्माण झाली. कृषि विभागाच्या कामकाजात त्यांच्या हातून कृषि विभागाची व या राज्याच्या शेतकऱ्यांची विशेष सेवा घडावी. आत्मा मालिक संकुलाच्या वतिने तब्बल १५० क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर क्रीडा स्पर्धेसाठी ३७ प्रकारचे क्रीडा मैदान सज्ज होते.

तीन दिवसिय सांस्कृतिक व क्रीडा (पुरूष) स्पर्धेत कब्बडीमध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूर, व्दितीय अकोला, तृतिय सातारा, (महिला) प्रथम पुणे, व्दितीय अहमदनगर, तृतिय सोलापूर. खो-खो – (पुरूष) प्रथम सोलापूर, व्दितीय सातारा, तृतिय कोल्हापूर, (महिला)- प्रथम पालघर, व्दितीय पुणे, तृृतिय औरंगाबाद, (पुरूष) – व्हाॅलिबाॅल प्रथम सोलापूर, व्दितीय नाशिक, तृतिय पुणे. (पुरूष) – क्रिकेट प्रथम पुणे, व्दितीय सातारा तृतिय लातूर, (महिला) – प्रथम पालघर, व्दितीय ठाणे, तृतिय कोल्हापूर. सांघीक खेळाबरोबर वयक्तिक खेळात पुणे विभागाने बाजी मारली आहे. विजेत्या संघाचे वयक्तिक खेळातील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्ती प्रत्रक व सुवर्ण, कांस्य, पदके देवून सन्मानीत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close