जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समता संकुलात ‘मुलांच्या समस्या,व पालकत्व ’यावर व्याख्यान

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील समता इंटरनॅशनल स्कूलने घरातील प्रत्येक आई-वडिलांसाठी ‘मुलांच्या समस्या, पालकत्वाला आव्हान’ या विषयावर पालक नोकरी-व्यवसायात यशस्वी असण्याबरोबरच ‘यशस्वी पालक’ होणेही महत्वाचे आहे. त्यासाठी रविवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता कोपरगाव शहरातील कलश लॉन्स,येथे व्याख्यानाचे आयोजन केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

‘मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मानसशास्त्र अभ्यासक, सुप्रसिध्द समुपदेशक चंद्रकांत पागे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लाभणार आहेत. सुजाण पालकत्व, परस्पर नातेसंबंध, भावनांक विकास आणि भावनिक संतुलन या विषयांवर देखील त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. उत्कर्ष मानवी जडण-घडण संस्था, नवी मुंबईचे ते अध्यक्ष असून शाळा, महाविद्यालये, गुरुजन, पालक, यांच्याविषयी आदर व जाणीवा जागृत करणाऱ्या परिणामकारक कार्यशाळा घेतल्याबद्दल विद्यार्थी सहाय्यता संघ, मुंबईद्वारा २००५ साली ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ तर देशप्रेमाचे आदर्श निर्माण करणारी नवी पिढी घडवण्यासाठी पालक आणि शिक्षकांना केलेल्या मार्गदशनाबद्दल त्याना राज्यातील विविध संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील पालकांनीही उपस्थित राहावे असे आवाहन समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close