जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

धारणगाव रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा-…या नागरिकांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरांतील नागरिकांच्या दळणवळणासाठी मध्यवर्ती असलेल्या धारणगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप सदरचे काम सुरु केले नाही हि बाब निंदनीय असून या मार्गावरील नागरिकांना जगणे व व्यापार करणे मुश्किल झाले असून नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसत असून हे काम कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने सुरु करावे अशी मागणी या रस्त्यावरील व्यापारी संघाचे सरचिटणीस उमेश धुमाळ यांनी केली आहे.

“धारणगाव रस्त्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा या कामाचे भूमिपूजन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नुतनीकरणाचे भूमिपूजन केले होते.त्याला दोन महीण्याचा कालावधी उलटला आहे.मात्र अद्याप या कामाची खडी अथवा तत्सम साहित्य अद्यापही आलेले नाही.त्यामुळे वर्तमानात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे”-उमेश धूमाळ,सरचिटणीस,व्यापारी महासंघ धारणगाव रोड.

कोपरगाव नगरपरिषदेने साधारण दोन महिन्यांपूर्वी भूमिपूजन करून धारणगाव रस्त्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा या कामाचे भूमिपूजन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नुतनीकरणाचे भूमिपूजन केले होते.त्याला दोन महीण्याचा कालावधी उलटला आहे.मात्र अद्याप या कामाची खडी अथवा तत्सम साहित्य अद्यापही आलेले नाही.त्यामुळे वर्तमानात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे या मार्गावरील व्यापारी व रहिवासी यांना या मार्गावरून दळणवळण करणे फारच मुश्किल झाले आहे.व्यापाऱ्यांना आपल्या दुकानात बसणे अडचणींचे ठरत आहे.अनेकांना धुळीचा त्रास होऊन दम्यासारखे आजार जडत आहे.या अंगावर अनेक अपघात होत आहे.नगरपरिषदेचा अतिक्रमण विरोधी ट्रॅक्टर पल्टी होता-होता वाचला आहे.अनेकांना अपघातात आपले हात-पाय गमवावे लागत आहे.त्यामुळे या मार्गाचे काम तातडीने सुरु करावे.या लोकशाहीर साठे खुल्या नाट्यगृहाचे कामही त्वरित सुरु करावे अशी मागणीही त्यांनी शेवटी केली आहे.

या प्रकरणी त्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना समक्ष भेटून आपल्या मागण्यांचे आज सकाळी निवेदन दिले आहे.त्या वेळी जितेंद्र रनशूर,गुलशन होडे,मयूर फाळके,मालाताई धोंगडी,अशोक होडे,बाळासाहेब देवकर,प्रल्हाद जमधडे,दीपक हिंगमीरे,सुखदेव जाधव,संतोष निकम,संतोष सुपेकर,राजू कोपरे,संजय मोरे,बाबासाहेब चौधरी सतीश रानोडे,अजय परिख आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close