कोपरगाव तालुका
माहेगाव देशमुख येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालूक्यातील माहेगाव देशमुख येथील श्री.अमृतेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी शुक्रवार (दि.२१) रोजी श्री.अमृतेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माहेगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
या निमित्त विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ५ ते ६ या वेळेत कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला आहे. सकाळी ७ ते ९ श्रींची पालखी व कावड मिरवणूक होणार असून सकाळी ९ ते ११ यावेळेत समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर यांचे जाहीर हरीकीर्तन होणार आहे. सायंकाळी ४ ते ६ यावेळेत पैलवानांसाठी भव्य कुस्त्यांचा जंगी हंगामा आयोजित करण्यात आला असून तमाशा रसिकांसाठी रात्री ९ वाजता कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे, मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य बहुरंगी तमाशा आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माहेगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.