जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव हद्दवाढीतील गटारीच्या कामास गती द्या-..या नेत्यांची सूचना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सर्वच विकास कामांबरोबर कोपरगाव शहरासह हद्दवाढ झालेल्या भागात भूमिगत गटारीचे प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहेत.

दरम्यान अलीकडील काळात शहर व तालुक्यात होणाऱ्या बैठकांना पत्रकारांना सर्वच नेते टाळताना दिसत असून ते का टाळतात ? हे समजायला मार्ग नाही.याचे सर्वच राजकीय नेत्यांना माध्यमांचे वावडे निर्माण झाले असून पत्रकारांची अनुपस्थिती हिच फॅशन समजू लागल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नेत्यांची वस्तुस्थिती लपविण्याची सोय होत असली तरी वस्तुस्थिती नागरिकांना समजू शकत नाही हि बाब वेगळी आहे.

कोपरगाव येथे आ.काळे यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीसाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,सहाय्यक नगररचनाकार दिपक बडगुजर,प्रकल्प सल्लागार साबळे,वास्तूरचना प्रकल्प सल्लागार गुरसळ,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,अपक्ष नगरसेवक मेहमुद सय्यद,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,फकीर कुरेशी,दिनकर खरे,कृष्णा आढाव,सचिन गवारे,अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. आशुतोष काळे यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मागील दोन वर्षापासून जीवघेण्या कोरोना महामारीचा सामना करीत आहोत.

महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केलेल्या उपाय योजनांमुळे कोपरगाव तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळविता आले.रुग्णसंख्या कमी झाली आहे हि जरी समाधानाची बाब असली तरी कोरोना संकट पूर्णपणे टळलेले नाही हे विसरून चालणार नाही. तसेच वातावरण बदलानुसार होणारे साथीचे आजार व उघड्या गटारींमुळे वाढणारी रोगराई चिंतेचा विषय ठरू शकते.त्यासाठी कोपरगाव शहरातील जवळपास सर्वच गटारी भूमिगत होणे गरजेचे आहे.तसेच भविष्यातील काळजी घेण्याच्या दृष्टीने हद्दवाढ झालेल्या भागात देखील भूमिगत गटारी हि काळाची गरज होऊन बसली आहे.त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहर व हद्दवाढ झालेल्या भागात भूमिगत गटारीच्या निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती देवून तातडीने प्रस्ताव तयार करा.सदर प्रस्तावांना महाविकास आघाडी सरकारकडून मंजुरी मिळवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले असल्याचे त्यांच्या प्रसिद्धी विभागाने कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close